Join us  

Cooking Tips : फक्त १ खास ट्रिक वापरून करा कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 2:09 PM

Cooking Tips : उपवासालाच नाही मधल्या वेळेत कधीही भूक लागल्यानंतर तुम्ही या चकल्या खाऊ शकता.

उन्हाळा सुरू झाला की पापडं, कुरड्या उपवासाचे पदार्थ करायला घराघरात सुरुवात होते. आजकाल कामाच्या गडबडीमुळे बरेच लोक बाहेरून  चकल्या, पापडं आणतात पण त्याला हवीतशी चव नसते. (Cooking Tips) अनेकांनी घरी बनवलेल्या साबुदाणा, बटाट्याच्या चकल्या व्यवस्थित फुगत नाहीत. तर कधी वातड होतात. म्हणूनच या लेखात तुम्हाला साबुदाणा, बटाट्याची चकली बनवण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. (How to make Sabudana Batata Chakali) जेणेकरून तुम्ही उत्तम चकल्या खाण्याचा आनंद घेऊ शकता. उपवासालाच नाही मधल्या वेळेत कधीही भूक लागल्यानंतर तुम्ही या चकल्या खाऊ शकता. (Easy Cooking tips & Tricks)

साहित्य (Sabudana Batata Chakaki sago potato sakali recipe)

साबुदाणे - 1 वाटी (रात्रभर भिजत ठेवावे)

वरीचे तांदूळ - 1 वाटी

बटाटे - उकडून, सोललेले आणि स्मॅश केलेले 6 मध्यम

आले- हिरवी मिरचीची पेस्ट- ३ टेबलस्पून

बेकिंग सोडा - ½ टीस्पून

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

कृती

नॉन-स्टिक पॅनमध्ये दोन कप पाणी गरम करा. त्यात वरीचे तांदूळ घालून मऊ होईपर्यंत शिजवा.

वरील मिश्रण थंड झाल्यानंतर साबुदाणे, कुस्करलेले बटाटे, आले-हिरवी मिरची पेस्ट, खाण्याचा सोडा आणि मीठ आणि चांगले मिसळा.

चकलीच्या सात्यात हे मिश्रण भरा आणि प्लास्टिकच्या शीटवर लहान गोलाकार दाबा. दोन दिवस उन्हात वाळवा.नंतर कढईत पुरेसे तेल गरम करा.

उन्हात वाळलेल्या चकल्या हलक्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. या चकल्या तुम्ही वर्षभर हवाबंद डब्यात साठवून ठेवू शकता. 

1)

2) 

3) 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न