रोजच्या जेवणात आपण असे अनेक रेसेपीज बनवतो त्यात बरेचसे पदार्थ किसून घालावे लागतात. बटाटे किंवा चिझ किसल्यानंतर किसणी वेळीच धुतली नाही तर कडक होते आणि नंतर धुणं अवघड होतं आणि पदार्थही त्यात अडकल्यामुळे वाया जातो. किसणी वापरण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर तुमचं काम सोपं होऊ शकतं. प्रसिद्ध खाद्य अभ्यासक संजीव कपूर यांनी पदार्थ किसण्यासंदर्भातील एक टिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Cooking Tips And Hacks) ज्याचा वापर तुम्ही रोजच्या स्वयंपाकात करू शकाल. (Sanjeev Kapoor Shares Easiest Kitchen Tips)
1) संजीव यांच्या म्हणण्यानुसार चीझ किंवा बटाटा किसण्यापूर्वी किसणीला तेल लावल्यानं काम सोपं होईल. पदार्थ घर्षणादरम्यान वाया जाणार नाही. याशिवाय पदार्थ चिकटही होणार नाही.
2) चीज किसताना सर्वात मोठी समस्या म्हणजे चीज आणि किसणीच्या पृष्ठभागामध्ये निर्माण होणारे घर्षण. चीज किसण्यापूर्वी त्याच्या पृष्ठभागावर कुकिंग स्प्रे लावल्याने चीज आणि किसणीच्या पृष्ठभागामध्ये निर्माण होणारे घर्षण कमी होण्यास मदत होते. यामुळे चीज किसणे खूप सोपे होते.
3) चीज, बटाटा किसल्यानंतर किसणी स्वच्छ करण्यासाठी जुना टूथब्रश वापरा. यामुळे लहान लहान छिद्रांमध्ये अडकलेली घाण साफ होण्यास मदत होईल.