रोजच्या जेवणातला डाळ भात पाहून कधीकधी कंटाळा येतो. बाहेरून काहीतरी मागवण्याची इच्छा होते. बाहेरची दाल फ्राय किंवा दाल खिचडी खाल्ली की, खूप छान वाटतं. पण तेच तांदूळ अन् तिच डाळ वापरून बनवलेले हॉटेलचे पदार्थ आपण चवीनं खातो. त्यापेक्षा घरीच डाळीत प्रयोग करून पाहिले तर जेवणाचा आनंद दुप्पटीनं वाढेल.
भारतात डाळींचे अनेक प्रकार पिकवले जातात. मूग, तुर, उडीद, चणा, मसूर आणि बरंच काही. यापैकी अनेक डाळी पचायला हलक्या असतात. खिचडी, सूप, मोड आलेले कडधान्य आपल्या आहारात हमखास असतात. रंग, आकार, चव वगळता या डाळी बनवण्याच्या पद्धतीही खूप आहेत. भारतभरात वेगवेगळ्या पद्धतीनं, आपल्या परंपरेनुसार डाळी शिजवल्या जातात. प्रत्येक भागात रोजच्या जेवणातील डाळीसाठी एक खास रेसेपी वापरली जाते.
दाल मखनी
उडदाची डाळ आणि राजमासह तयार केलेली ही डाळ पंजाबी पदार्थांमध्ये मोडते. लच्छा पराठा किंवा जीरा राईससह दाल मखनीची चव घेता येऊ शकते.
दाल फ्राय
सर्वात सोपी आणि पटकन तयार होणारी डाळ रेसिपी आपल्यापैकी बहुतेकांना आवडते आहे. शिजवण्याची पद्धत सारखी असते पण फोडणी देताना मात्र काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.
सिंधी दाल
हा सिंधी पाककृतीचा एक क्लासिक प्रकार आहे. पण ही डाळ वेगवेगळ्या सिंधी पद्धतीच्या खाद्यपदार्थांसह सर्व केली जाते.
आमटी
आमटी म्हणजे पारंपारिक महाराष्ट्रीयन डाळीची रेसिपी थोडी तिखट, गोड आणि मसालेदार.
कोकणी वरण
रोजच्या जेवणात बदल म्हणून कोकणी वरण नक्की ट्राय करून पाहा
खट्टी दाल
राजस्थानी लोक अशा प्रकारची डाळ आपल्या आहारात घेतात. डाळीचा हा प्रकार खूप चटपटीत आहे.