Join us  

पावसाळ्यात पचायला हलकी, जेवायला रुचकर, करा टमाट्याची कढी! या चवीची रंगत न्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 7:39 PM

ताकाची कढी सगळ्यांनाच माहिती आहे पण टमाट्याची कढीही करता येते. ही टमाट्याची कढी चवीला अगदी चटपटीत लागते. पावसाळ्यातल्या कुंद वातावरणात तर रात्रीच्याच नाहीतर कधी दुपारच्या जेवणालाही गरम टमाट्याची कढी आणि वाफाळलेला भात याचा आस्वाद घेता येतो.

ठळक मुद्देपोळी, भात यासोबत खाता येईल आणि वेगळं खाण्याची इच्छा पूर्ण करणारा असा पदार्थ म्हणजे टमाट्याची कढी.आवडत असल्यास कढीत चवीपुरती साखर घालावी. ही कढी साखर न घालताच छान लागते.छायाचित्रं : गुगल

रात्री जेवणाला काय करायचं हा प्रश्न बर्‍याचदा पडतो. सकाळी पोळी भाजी खाल्लेली असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी वेगळं काही तरी हवं असतं. पोळी, भात यासोबत खाता येईल आणि वेगळं खाण्याची इच्छा पूर्ण करणारा असा पदार्थ म्हणजे टमाट्याची कढी.ताकाची कढी सगळ्यांनाच माहिती आहे पण टमाट्याची कढीही करता येते. ही टमाट्याची कढी चवीला अगदी चटपटीत लागते. पावसाळ्यातल्या कुंद वातावरणात तर रात्रीच्याच नाहीतर कधी दुपारच्या जेवणालाही गरम टमाट्याची कढी आणि वाफाळलेला भात याचा आस्वाद घेता येतो.टमाट्याची कढी करण्यासाठी 6 टमाटे, कढी पत्त्याची पानं, 2 चिमूट हिंग, अर्धा चमचा जिरे, पाव कप बेसन, दोन तीन चमचे तेल, कोथिंबीर, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, मोहरी, अर्धा चमचा किसलेलं आलं आणि चवीनुसार मीठ एवढी सामग्री लागते. 

छायाचित्र : गुगल

टमाट्याची कढी कशी करणार?

टमाट्याची कढी करण्यासाठी आधी टमाटे धुवून त्याच्या मोठ्या फोडी चिराव्यात. त्या मिक्सरमधून बारीक करुन घ्याव्यात. नंतर कढईमधे तेल गरम करुन त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद,आल्याची पेस्ट, आणि कढी पत्ता घालून हे सर्व परतून घ्यावं. नंतर यात टमाट्याची पेस्ट घालवी. हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यावं. एका भांड्यात बेसन घेऊन त्यात दीड कप पाणी घालून ते चांगलं एकत्र करुन घ्यावं. त्यात गुठळ्या राहायला नको. बेसनाचं मिश्रण टमाट्याच्या पेस्टमधे घालावं. कढी दाटसर होईपर्यंत उकळावी. आवडत असल्यास कढीत चवीपुरती साखर घालावी. ही कढी साखर न घालताच छान लागते. गॅस बंद केल्यावर वरुन चिरलेली कोथिंबीर घालावी.