आपण जे काही अन्न खातो, त्यातील पौष्टिक घटक (nutritional value from food) पुरेपूर आपल्याला मिळावेत, असा आपला आटोकाट प्रयत्न असतो. त्यासाठीच तर आपण आपल्या रोजच्या जेवणाच्या माध्यमातून वेगवेगळे पौष्टिक पदार्थ खाण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. पण नकळतपणे किंवा रोजच्या सवयीचा भाग म्हणून आपल्याच हातून काही चुका होऊन जातात आणि मग त्या चुकांमुळे ( 3 common cooking mistakes) अन्न पदार्थातले पौष्टिक घटक कमी होत जातात. असं होऊ नये म्हणून स्वयंपाक करताना या काही गोष्टींची काळजी प्रत्येकीने घेतलीच पाहिजे.
या चुकांमुळे कमी होते अन्नपदार्थांमधली पौष्टिकता..
१. जेवणाच्या खूप आधीच स्वयंपाक करणे
अनेक घरांमध्ये असं दिसून येतं की दिवसभराच्या व्यस्त शेड्यूलमुळे घरातली महिला सकाळी लवकरच स्वयंपाक करून ठेवते. पण त्यानंतर जवळपास ६ ते ७ तासांनी तो स्वयंपाक खाल्ला जातो.
'साडी विथ जॅकेट', नवा स्टायलिश ट्रेण्ड! यंदा लग्नसराईत दिसा स्पेशल, निवडा आपल्या साडीवर खास जॅकेट
त्यातही प्रत्येकवेळी तो गरम केला जातो. शिजवलेले अन्न ३ ते ४ तासांमध्ये पोटात गेले तर ते अधिक उत्तम मानले जाते. शिवाय वारंवार अन्न गरम केल्याने त्यातील पाैष्टिकता कमी होते.
२. भाज्या खूपच आधी चिरून ठेवणे
काही जणी स्वयंपाक करण्याची बेसिक तयारी आधी करून ठेवतात. जसं की कणिक भिजवून ठेवणे, भाज्या चिरून ठेवणे.. डाळ- तांदूळ काढून ठेवणे. जेणेकरून मग ऐनवेळी स्वयंपाक पटापट होतो.
बघा तिची हिंमत! वाघासोबत केलं डेंजर फोटोसेशन, ते पाहूनच नेटिझन्स म्हणाले.....
पण कणिक खूप आधी मळून ठेवल्याने किंवा भाज्या आधीच चिरून ठेवल्याने त्या दोघांमधले पोषणमुल्य कमी कमी होत जाते. त्यामुळे भाज्या चिरल्या की त्या लगेचच फोडणी दिल्या पाहिजेत.
३. भाज्या खूप जास्त शिजवणे
जेव्हा आपण मसालेदार भाज्या करतो तेव्हा त्यात ग्रेव्हीसाठी टाकण्यात येणारा कांदा- टोमॅटो आणि इतर मसाले आपण खूप जास्त परतून घेतो. त्याच्यातून तेल सुटेपर्यंत आणि त्यांचा रंग बदलेपर्यंत ते परतले जातात. पण असं केल्याने भाजीचा चव जरी चांगली येत असली, तरी त्यातील पौष्टिकता मात्र खूपच कमी झालेली असते.