Join us  

Cooking Tips : नॉन स्टिक पॅनमध्ये चुकूनही बनवू नका 'हे' 5 पदार्थ; तवा कधी गंजून खराब होईल कळणारही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 2:59 PM

Cooking Tips : नॉन-स्टिक पॅनमध्ये एक विशेष कोटिंग असते जे अन्न चिकटण्यापासून प्रतिबंधित करते, परंतु आपण त्यात सर्वकाही शिजवायला हवं असं नाही. 

नॉन-स्टिक पॅन (Non stick pan) आपल्या सगळ्यांचाच किचनमधली एक अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. वापरायला सोपे आणि स्वस्तात मिळणारे नॉन स्टिक पॅन आपली बरीच  कामं  सोपी करतात. (Kitchen Hacks) यात जेवण शिजवणं देखील आरामदायक आहेत. या प्रकारच्या  नॉन-स्टिक पॅन्सची खासियतच वेगळी आहे. यात बर्‍याच वेगवेळ्या  डिशेस अगदी सहज शिजवल्या जाऊ शकतात ज्या सामान्य पॅनमध्ये बनवणे खूप कठीण आहे. (Easy Cooking Tips)

नॉन स्टिक पॅनची खासियत काय असते?

नॉन-स्टिक पॅनमध्ये एक विशेष कोटिंग असते जे अन्न चिकटण्यापासून प्रतिबंधित करते, परंतु आपण त्यात सर्वकाही शिजवायला हवं असं नाही. आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही कधीही नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवू नये.

१) व्हेजिटेबल स्टिर फ्राय

स्टिर फ्राय भाज्या आजकाल खूप लोकप्रिय होत आहेत. एकप्रकारे, ही एक फॅन्सी डिश आहे आणि त्याच वेळी ती जास्त तेल आणि मसाल्याशिवाय बनविली जाते, त्यामुळे लोकांना ते आवडते, पण अशा तळलेल्या भाज्या ज्या कॅरमेलाईझ कराव्या लागतात म्हणजेच जास्त वेळ शिजवाव्या लागतात. ज्याला जास्त उष्णता लागते, त्या भाज्या नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवू नका. नॉन-स्टिक पॅनला जास्त उष्णता देऊ नये कारण त्याचा त्यांच्या कोटिंगवर परिणाम होतो. अशा स्थितीत नॉन-स्टिक पॅनमध्ये जास्तवेळ पदार्थ शिजवल्यानं ते खराब होण्याची शक्यता असते.

२) बर्गर, मीट

इथेही हेच लॉजिक आहे की नॉन-स्टिक पॅनला जास्त उष्णता देऊ नये. नॉन-स्टिक पॅन जास्त वेळा गरम केला तर त्याचं कोटींग वितळू लागतो. या तापमानात कोटिंगमधून निघणारा धूरही विषारी असू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही बर्गर, मीट वगैरे शिजवले तर ते तव्यासाठीही आणि आरोग्यासाठीही चांगले नाही.

३) स्लो कुकींग, मंद आजेवर शिजवावे लागणार  पदार्थ

सॉस, सूप, मांस, खीर किंवा कोणतीही डिश ज्यामध्ये डिग्लेझिंगचा समावेश असतो, ज्यामध्ये तुम्हाला बराच वेळ मंद आचेवर शिजवावे लागते आणि ते पॅनला चिकटू लागतात. हे सर्व पदार्थ नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवू नयेत. याचा परिणाम तव्याच्या कोटींगवरही होतो आणि जर तव्याचा लेप अन्नामध्ये आढळला तर ते तुमच्या आरोग्यासाठीही चांगले नाही.

नॉनस्टिक पॅन कधी वापरायचा?

ज्या पदार्थांना उच्च उष्णता आवश्यक नसते. अंडी, पॅनकेक्स, मासे, चीज, नूडल्स इत्यादीपासून बनवलेले पदार्थ  तुम्ही नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवू शकता. हे सर्व पदार्थ खूप लवकर तयार होतील आणि त्याच वेळी आपल्या पॅनमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

नॉन-स्टिक पॅनमध्ये मिसळ्याची आणि पलटण्याची  समस्या येत नाही, म्हणून डोसा,  चीला, ऑम्लेट यांसारख्या गोष्टी देखील खूप चांगल्या प्रकारे बनवल्या जातात. या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही तुमचा तवा वर्षानुवर्ष चांगला ठेवू शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्नहेल्थ टिप्स