सगळ्याच्याच घरी जास्तीचा भात उरला तर तो नंतरच्या दिवशी फोडणीच्या भाताच्या स्वरूपात खाल्ला जातो. खूप जणांना ताज्या भातापेक्षा शिळा भात खायला जास्त आवडतो. फ्राईड राईस उरलेल्या भातापासून बनवलेली ही एक अप्रतिम रेसिपी आहे. ( fried rice Recipe from leftover rice) या भातात तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या घालू शकता. (Cooking Tips and Hacks)
तुम्ही फक्त 20 मिनिटांत फ्राईड राईस तयार करू शकता. रात्रीच्या जेवणात तुम्ही हे स्वादिष्ट भात कोणत्याही मसालेदार करीसोबत सर्व्ह करू शकता. बेबी कॉर्न, गाजर, कोबी यांसारख्या आरोग्यदायी भाज्या त्यात टाकल्या जातात. याशिवाय चव वाढवण्यासाठी सोया सॉस, हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचाही वापर केला जातो. (Vegetable fried rice Recipe from leftover rice)
व्हेजिटेबल फ्राईड राईससाठी लागणार साहित्य
१ वाटी (उकडलेले) तांदूळ, १ टेबलस्पून तेल २-३ लसूण, तुकडे १ लाल मिरची, १ टेस्पून गाजर, ३-४ बेबीकॉर्न, चिरलेला ४-५ कोबी, १/२ टीस्पून तीळ, 4-5 चमचे बीन्स मीठ चवीनुसार काळी मिरी, 1 टीस्पून सोया सॉस, 2-3, सजावटीसाठी कोथिंबीर
व्हेजिटेबल फ्राईस बनवण्याची योग्य पद्धत
१) एका कढईत एक चमचा तेल टाका, त्यात लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून तळून घ्या.
२) त्यात गाजर, बेबी कॉर्न, बीन्स आणि कोबी घाला. त्यात तिळ घाला. हे पदार्थ शिजल्यानंतर त्यात भात घाला.
३) मीठ, मिरपूड घालून सोया सॉस आणि वाईन घाला आणि 1 मिनिट शिजवा.
४) कोथिंबीरनीनं सजावट करा आणि गरमागरम भात सर्व्ह करा.