अनेकदा महिला स्वयंपाक घरात दूध गॅस वर ठेवलं की गॅस बंद करायला विसरतात. दूध जास्त वेळ उकळलं की ते भांड्यातून खाली पडू लागतं, अशा स्थितीत दुध वाया जातंचं पण ओटा, गॅस खराब होतं ते वेगळंच. बरेच लोक दूध उतू जाणे अशुभ मानतात. अशा वेळी जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दूधाचा गॅस बंद करायला विसरलात तर तुम्ही हा देसी जुगाड नक्की करून पाहायला हवा.
सोशल मीडियावर दुधाच्या भांड्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. @saffrontrail नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की- तुम्हाला माहीत आहे का की दुधाच्या भांड्यावर लाकडी चमचा ठेवल्यानं दूध उकळ्यानंतरही खाली पडत नाही. हा व्हिडिओ नेटीझन्सच्या पसंतीस उतरला आहे.
कारण भांड्यावर लाकूड किंवा चमचा ठेवला तर दूध उकळूनही भांड्यातून बाहेर पडणार नाही. त्यामुळे दूधही वाचेल आणि दूध उतू गेल्यामुळे गॅस स्वच्छ करण्याचं टेंशनही नसेल. 13 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दुधाने भरलेले भांडे गॅसवर बसवल्याचे दाखवण्यात आले आहे. नंदिता अय्यर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ७४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून १९०० पेक्षा अधिक लोकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
भांड्याच्या वर एक लाकडी चमचा देखील ठेवला जातो. असे केल्याने दूध भरपूर उकळूनही भांड्यातून बाहेर पडणार नाही. हा व्हिडिओ ट्विटर युजर @luvjoongiee ने देखील शेअर केला आहे. त्याने लिहिले- मी टिकटॉकवर पाहिले की तुम्ही जवळजवळ उकळलेल्या भांड्यावर लाकडी चमचा ठेवला तर ते उकळणे थांबेल. ही खरंच कामाची गोष्ट आहे.