Lokmat Sakhi >Food > सकाळच्या घाईत नाश्त्याला करा कोथिंबीर पराठा; कॅल्शियम भरपूर, हेल्दी-हटके रेसिपी...

सकाळच्या घाईत नाश्त्याला करा कोथिंबीर पराठा; कॅल्शियम भरपूर, हेल्दी-हटके रेसिपी...

Coriander Paratha Recipe for Healthy Breakfast : सकाळच्या घाईत पोळ्यांची कणीक भिजवलेली असतानाच होणारी टेस्टी रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 08:37 AM2023-05-29T08:37:19+5:302023-05-29T08:40:01+5:30

Coriander Paratha Recipe for Healthy Breakfast : सकाळच्या घाईत पोळ्यांची कणीक भिजवलेली असतानाच होणारी टेस्टी रेसिपी..

Coriander Paratha Recipe for Healthy Breakfast : Make coriander paratha for breakfast in the morning rush; Calcium-rich, healthy-hot recipes... | सकाळच्या घाईत नाश्त्याला करा कोथिंबीर पराठा; कॅल्शियम भरपूर, हेल्दी-हटके रेसिपी...

सकाळच्या घाईत नाश्त्याला करा कोथिंबीर पराठा; कॅल्शियम भरपूर, हेल्दी-हटके रेसिपी...

रोज सकाळी हेल्दी आणि तरीही टेस्टी नाश्ता काय करायचा असा प्रश्न तमाम महिलांना पडतो. मुलांना काहीतरी चविष्ट हवे असते आणि आईला मुलांच्या पोटात पौष्टीक काहीतरी जावे असे वाटत असते. आता या दोन्हीचा मेळ घालायचा म्हणजे आईची खरी कसरत असते. पण थोडं डोकं चालवलं तर अगदी सकाळच्या घाईतही पौष्टीक आणि तरीही चविष्ट असे पदार्थ आपण मुलांना आणि कुटुंबातील सर्वांनाच देऊ शकतो (Coriander Paratha Recipe for Healthy Breakfast). 

आपल्या घरात साधारणपणे कोथिंबीर असतेच याच कोथिंबीरीपासून झटपट होतील असे लच्छा पराठे कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. यासाठी मेथी पराठ्याप्रमाणे पीठात सगळे घालायची गरज नसते. कारण त्यामुळे पराठा थोडासा कोरडा होऊ शकतो. तर कोथिंबीरीचे सारण तयार करुन घेऊन अगदी झटपट हा पराठा तयार करता येतो. गरमागरम पराठा दही, सॉस किंवा लोणचं अशा कशासोबतही अतिशय छान लागतो. पाहूयात हा पराठा करण्याची सोपी रेसिपी ...

साहित्य -

१. कोथिंबीर - अर्धी वाटी

(Image : Google)
(Image : Google)

२. लसूण - ४ ते ५ पाकळ्या

३. ओवा - अर्धा चमचा 

४. तीळ - १ चमचा 

५. तिखट - अर्धा चमचा 

६. हळद - पाव चमचा

७. धणेजीरे पावडर - अर्धा चमचा 

८. मीठ - चवीप्रमाणे 

९. कणीक - २ वाट्या 

१०. तूप किंवा बटर - २ चमचे

११. आमचूर किंवा चाट मसाला - अर्धा चमचा 

कृती -

१. पोळ्यांना भिजवतो त्याचप्रमाणे कणीक मळून ती झाकून ठेवावी.

२. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, तीळ, ओवा आणि लसूण बारीक करुन घ्यायचा.

३. हे मिश्रण एका ताटलीत काढून त्यामध्ये मीठ, मसाला, तिखट, हळद, धणेजीरे पावडर, आमचूर पावडर घालून सगळे चांगले एकजीव करायचे. 

४. कणकेचा गोळा करुन त्याची नेहमी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची.

५. यावर थोडे पीठ आणि तेल लावून कोथिंबीरीचे हे मिश्रण सगळीकडे चांगले पसरुन लावायचे.

६. लच्छा पराठाला करतो त्याप्रमाणे ही पोळी गोलाकार दुमडून पुन्हा एकदा गोलाकार फिरवायची.

७. हा गोळा दाबून घेऊन पुन्हा जास्त दाब न देता एकसारखा लाटायचा.

८. तवा चांगला तापला की त्यावर बटर किंवा तूप सोडून हा पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचा.

९. तीळाच्या जागी आवडत असेल तर दाण्याचा कूटही घालू शकता यामुळे पोष्टीकता आणखी वाढण्यास मदत होते. 

 

 

Web Title: Coriander Paratha Recipe for Healthy Breakfast : Make coriander paratha for breakfast in the morning rush; Calcium-rich, healthy-hot recipes...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.