Join us

रोजच्या जेवणात १ चमचा 'ही' हिरवी चटणी खा; हिमोग्लोबीन वाढेल, वजनही भराभर होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 16:36 IST

Coriander Pudina Chutney Benefits : या चटणीने तोंडाची  चव वाढवण्यात बरेच फायदे मिळतात.

स्वादीष्ट आणि चटपटीत जेवण प्रत्येकालाच आवडते. असे बरेच लोक आहेत जे जेवणासोबत लोणचं, चटणी खातात. कोथिंबीर आणि पुदिन्यांची चटणी सगळ्यात जास्त पसंत केली जाते. या चटणीने तोंडाची चव वाढवण्यात बरेच फायदे मिळतात. रोज १ चमचा हिरव्या चटणीचे सेवन केल्यानं बरेच फायदे मिळतात. हेल्थ एक्सपर्ट्स शीनम कालरा मल्होत्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Coriender Pudina Chutney  Benefits)

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की या चटणीचे रोज सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. जर तुम्हाला एसिडीटी, सूज, पचनक्रियेसंबंधित समस्या उद्भवत असतील तर आहारात या पदार्थांचा समावेश करा. पुदीना  आणि कोथिंबीरीत एंटी ऑक्सिडेंट व्हिटामीन, मिनरल्स भरपूर असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

पुदिना तुमच्या पोटाच्या मांसपेशींना आराम देण्यास मदत करते. ज्यामुळे पचनाच्या समस्यांची तीव्रता कमी होते. पुदिन्यांचा फ्रेशनेस तुमचे पचनतंत्र चांगले राहते. कोथिंबीरीचा गारवा एसिडीटी, सूज कमी होण्यास मदत होते. या चटणीत व्हिटामीन सी भरपूर असते. ज्यामुळे  इम्युनिटी बूस्ट होते. अंगात रक्त वाढण्यासही मदत होते.

 

एक मूठभर ताजी पुदिन्याची पानं, एक मूठ कोथिंबीर,  एक छोटा तुकडा आलं, एक चिमूटभर मीठ, एक लिंबाचा रस, २ ते ४ लसणाच्या कळ्या, १ चुटकी जीरं पावडर. हे साहित्य एकत्र ठेवून मिक्सरमध्ये घालून एक  घट्ट पेस्ट बनवा. नंतर जारमधून काढून घ्या, नंतर थोडं मोहोरीचं तेल मिसळा.  हे डिप किंवा स्प्रेड स्वरूपात वापरू शकता. पराठ्यासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहेल्थ टिप्स