Lokmat Sakhi >Food > नाश्त्याला कॉर्नफ्लेक्स खाणं खरंच पराठ्यापेक्षा पौष्टिक आहेत? तज्ज्ञ सांगतात, पराठे बरे की...

नाश्त्याला कॉर्नफ्लेक्स खाणं खरंच पराठ्यापेक्षा पौष्टिक आहेत? तज्ज्ञ सांगतात, पराठे बरे की...

Corn Flakes Vs Paratha Which Is Better For Breakfast Know Expert Opinion : वजन कमी करायचं म्हणून पराठे किंवा पारंपरिक पदार्थ सोडून कॉर्नफ्लेक्स खाणं खरंच फायद्याचं आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 05:00 PM2023-03-23T17:00:51+5:302023-03-23T17:20:57+5:30

Corn Flakes Vs Paratha Which Is Better For Breakfast Know Expert Opinion : वजन कमी करायचं म्हणून पराठे किंवा पारंपरिक पदार्थ सोडून कॉर्नफ्लेक्स खाणं खरंच फायद्याचं आहे?

Corn Flakes Vs Paratha Which Is Better For Breakfast Know Expert Opinion | नाश्त्याला कॉर्नफ्लेक्स खाणं खरंच पराठ्यापेक्षा पौष्टिक आहेत? तज्ज्ञ सांगतात, पराठे बरे की...

नाश्त्याला कॉर्नफ्लेक्स खाणं खरंच पराठ्यापेक्षा पौष्टिक आहेत? तज्ज्ञ सांगतात, पराठे बरे की...

सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसभराच्या रुटीनचा एक महत्वाचा भाग आहे. सकाळचा नाश्ता करणे फारच महत्वाचे असते कारण यातूनच आपल्याला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. दिवसभर ताजेतवाने, उत्साही राहण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते. दिवसभर लागणारी हीच ऊर्जा आपल्याला सकाळच्या नाश्त्यामधून मिळते. तज्ज्ञांच्या मते, सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा, यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते. तंदुरुस्त आणि सशक्त राहण्यासाठी दररोज निरोगी आणि पौष्टिक नाश्ता घेणे खूप महत्वाचे आहे.

आपल्यापैकी बरेचजण नाश्त्याला वेगवेगळे पराठ्यांचे प्रकार किंवा दुधासोबत कॉर्नफ्लेक्सचे सेवन करतात. पूर्वीच्याकाळी बहुतेक घरांमध्ये नाश्त्यासाठी पराठा खाल्ला जात होता. परंतु आजच्या काळात बहुतांश लोकांच्या नाश्त्यातून पराठा खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नाश्त्यात पराठा आरोग्यदायी नसतो असे गृहीत धरून आपण कॉर्न फ्लेक्स, ओट्स यांसारख्या गोष्टी आपल्या नाश्त्याचा भाग बनवत आहोत. ऑफिसला जाणार्‍या लोकांना नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही, यामुळे ते रेडीमेड नाश्ता घेणे पसंत करतात. त्याचवेळी, वजन कमी करण्यासाठी, लोक पराठ्याच्या तुलनेत तृणधान्ये निवडतात. पण तृणधान्ये खरोखरच आरोग्यदायी आहेत का? वजन कमी करण्यासाठी पराठ्यापेक्षा कॉर्नफ्लेक्स चांगले आहेत का? हे एक्स्पर्टकडून समजून घेऊयात(Corn Flakes Vs Paratha Which Is Better For Breakfast Know Expert Opinion).

या दोन्ही पदार्थात नक्की किती कॅलरीज असतात ? 

जर आपण १०० ग्रॅम पराठ्याला ५ ग्रॅम तूप लावून भाजता किंवा १०० ग्रॅम स्टफ्ड पराठ्याला ५ ग्रॅम तुपासोबत लावून खात असाल तर याची एकूण कॅलरीज जवळजवळ २०० ते २५० कॅलरीज इतकी असते. पराठे बनवतांना त्याची साइज आणि त्यांतील स्टफिंगचे प्रमाण याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पराठा हा नेहमी छोट्या डिनर प्लेटच्या साइजचा असावा. पराठ्याचे पोषण मूल्य कॉर्नफ्लेक्सपेक्षा अधिक असते आणि यामुळे पोट दीर्घकाळ भरले जाईल.

दुसरीकडे, जर आपण अर्धा कप कॉर्नफ्लेक्स घेतले जे जवळजवळ १ कप पराठ्याच्या बरोबरीचे आहे, असे असले तरीही कॉर्नफ्लेक्स खाऊन आपले पोट भरले जाणार नाही. कॉर्नफ्लेक्स सोबतच जर आपण हेल्दी मुस्लीचा विचार केला, तर आपण पराठ्याच्या बरोबरीच्या तुलनेत म्हणजेच २ टेबलस्पून मुस्ली जरी घेतली तरी आपले नाश्त्याला आपले पोट भरले जाणार नाही. जर आपण सकाळच्या नाश्त्याला १०० ग्रॅम कॉर्नफ्लेक्स दुधासोबत घेतले तर त्यात सुमारे ३०० कॅलरीज असतात, ज्या पराठ्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत. जर आपण तृणधान्यांनीयुक्त कॉर्नफ्लेक्समध्ये नट आणि फळे घातली तर त्याच्या कॅलरीज आणखीनच वाढतात. तेच जर आपण दुसरीकडे, पराठ्यांमध्ये भाज्यांचे योग्य प्रमाणांत स्टफिंग भरुन पराठा बनवला तर तो ताजा बनविलेला पराठा खूपच सुंदर लागतो   आणि त्यातून आपल्याला अधिक पोषणही मिळते.     

या गोष्टीही लक्षांत ठेवा... 

आपण पराठा भाजून घेण्यासाठी जर रिफाईंड ऑईलचा वापर करत असाल तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. रिफाईंड ऑईलचा वापर केल्याने आपल्या चयापचय क्रियेचा वेग मंदावतो. याचा अर्थ असा नाही की आपण तुपाचे कितीही प्रमाणात सेवन करु शकता. पराठा भाजून घेण्यासाठी  तुपाचा जास्त प्रमाणांत वापर करु नये. आपण भाज्यांनी स्टफ्ड केलेला पराठा फक्त ५ ग्रॅम पांढऱ्या तुपासोबत खाऊ शकता. तसेच पराठा भाजताना देखील केवळ ५ ग्रॅम इतक्याच प्रमाणात तूपाचा वापर करावा. पराठ्यांना ५ ग्रॅम पेक्षा जास्त तूप लावू नये. पराठे खातांना त्यांसोबत तूप असू दे किंवा लोणी ते ५ ग्रॅम पेक्षा अधिक खाऊ नये. डाएटिशियन स्वाती बथवाल यांच्या म्हणण्यानुसार, पराठ्यांची न्यूट्रिशन व्हॅल्यू ही कॉर्नफ्लेक्सच्या न्यूट्रिशन व्हॅल्यूपेक्षा जास्त असते. पराठा हा फ्रेश घरच्या घरी बनवला जातो. त्यामुळे हा हेल्दी पराठा खाऊन आपले पोट भरते. त्यामुळे जास्त काळासाठी आपल्याला भूक लागत नाही.    


 

पराठा की कॉर्नफ्लेक्स, नक्की तज्ज्ञ काय सांगतात... 

१. पराठा हा आपण घरीच बनवतो त्यामुळे तो ताजा आणि फ्रेश असतो. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक पिठांचा वापर करुन पराठे बनवू शकतो. आपण पराठ्यांमध्ये विविध प्रकारच्या भाज्या, डाळी व पनीर घालून हाय प्रोटीन पराठा देखील बनवू शकता.

२. पराठ्यांचे स्टफिंग तयार करताना जास्त प्रमाणात बटाट्यांचा वापर करू नका. शक्यतो बटाटा वापरणे टाळाच. याऐवजी, पराठ्यांचे स्टफिंग बनविण्यासाठी  वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर नक्की करावा. यामुळे आपल्या शरीरात प्रोटीनचे अधिक प्रमाणात सेवन केले जाईल.

३. आपण ज्वारी, नाचणी व सातूच्या पिठाचे देखील पराठे बनवू शकता. या पिठांपासून पराठे बनवल्यास आपल्या शरीराला अधिक प्रमाणांत फायबर मिळेल. या पीठांचे तयार केलेले पराठे जर आपण खाल्ले तर फायबरचे सेवन केल्यामुळे आपले पोट अधिक काळ भरलेलं राहिलं. यामुळे आपल्याला वारंवार भूक नाही लागणार. जास्त काळासाठी पोट भरलेले राहिल्यामुळे आपल्याला ओव्हरइटिंगची सवय लागणार नाही.

 

४. कॉर्नफ्लेक्स असू दे किंवा मुस्ली ते पराठ्यांच्या तुलनेत कमी पौष्टिक असतात. कॉर्नफ्लेक्स आणि मुस्ली बाजारांत हाय फायबर म्हणून विकले जातात. परंतु प्रथम त्यांना मशीन प्रोसेस करुन त्यातून फायबर काढले जाते, त्यानंतर त्यात आर्टिफिशियल फायबर आणि प्रथिने घातली जातात. 

५. कॉर्नफ्लेक्स व मुस्ली हे प्रोसेस्ड (प्रक्रिया केलेले) फूड आहे. कोणतेही प्रक्रिया केलेले अन्न आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. 

६. कॉर्नफ्लेक्समध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. त्यात जलद कार्य करणारे ग्लुकोज असते. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी लवकर वाढते. ते खाल्ल्यानंतर लगेच भूक लागते.

७. कॉर्न फ्लेक्समध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात जे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात.

Web Title: Corn Flakes Vs Paratha Which Is Better For Breakfast Know Expert Opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.