उद्या नाश्त्याला काय करायचं? हाच प्रश्न घरोघरच्या बायकांना पडलेला असतो. रोज पोहे, उपमा तेच तेच खाऊन घरातली मंडळी कंटाळलेली असतात. रोज काय तेच तेच बनवतेस, असं अनेकदा ऐकावं लागतं. म्हणूच आज आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी परफेक्ट, कमी कमी वेळात होणारी एक भन्नाट रेसेपी सांगणार आहोत. त्यासाठी तुम्हाला जास्त साहित्यही लागणारही. पावसाळ्याच्या दिवसात ताजे ताजे मक्याचे कणीस बाजारात मिळतात. ब्रेड आणि मक्याच्या दाण्याचा वापर करून तुम्ही मस्त कॉर्न सॅण्डविच तयार करू शकता. असं सॅण्डविच खाऊन घरची मंडळीही तुफान खूश होतील.
साहित्य
4 ब्रेड स्लाइस
1 वाटी कॉर्न उकडलेले
1 बारिक चिरलेली शिमला मिरची
1 मिडीयम बारिक चिरलेला कांदा
1 चीझ क्यूब बाारिक किसलेले
चवीपूरतं मीठ
1/2 टीस्पून काळी मिरी पूड
3 टीस्पून पुदीना चटणी ब्रेडला लावण्यासाठी
ऑर्गेनो किंवा मिक्स हर्ब्स
बटर
कृती
सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये कॉर्न, शिमला मिरची,कांदा, चीज, मीठ, काळीमिरी, ऑर्गेनो हे सर्व साहित्य घालून मिश्रण तयार करून घ्या.
त्यानंतर ब्रेड स्लाइसला पुदीना चटणी लावून घ्या. चटणी लावून झाल्यानंतर ब्रेडवर तयार केलेलं मिश्रण भरुन घ्या. मग वरुन दोन्ही बाजूंना बटर लाऊन टोस्ट करून घ्या. आता आपलं सॅण्डविच खाण्यासाठी तयार आहे.
सॅण्डविच तयार करण्यासाठी ओवन किंवा टोस्टर तुमच्याकडे नसेल तर तव्यातही करु शकता.
तुम्ही हे सॅण्डविच टोमॅटो सॉस किंवा चटणीसह खाऊ शकता. पुदिन्याची चटणी लावण्याआधी तुम्ही ब्रेडवर तुमच्या आवडीच्या फ्लेवरचे चिझ स्प्रेडही लावू शकता. आवडीनुसार बारीक शेव सॅण्डविचमध्ये सजावटीकरीता वापरू शकता.