पावसाळा सुरू झाला की पर्यटन स्थळांवर आणि आपल्या शहरातल्या, गावातल्या भाजी मार्केटमध्ये मक्याची कणसं (corn) विकायला येतात. पावसाळा आणि हिवाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात मक्याच्या कणसाचा आस्वाद घेता येतो. स्वीट कॉर्न किंवा अमेरिकन कॉर्न जे असतात, ते मुळातच गोड असतात. त्यामुळे ते भाजून चटकन खाल्ले जातात. पण आपल्या प्रांतात उगवणारा जो देशी मका असतो, त्यात तेवढा गोडवा नसल्याने बरेच जण तो खाण्याचा कंटाळा करतात. पण खरंतर स्वीट कॉर्नपेक्षाही आपला देशी मका अधिक पौष्टिक (How to make delicious corn upma?) आहे. म्हणूनच तो मका भाजून खायला आवडत नसेल, तर त्याचा असा चवदार उपमा (Corn Upma recipe) करून खा. नाश्त्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम ठरू शकतो.
कसा करायचा मक्याचा उपमा?साहित्य३ ते ४ मक्याची कणसं, २ ते ३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, २ टेबलस्पून तेल, ३- ४ लसूणाच्या पाकळ्या, अर्धा टीस्पून आल्याचा किस, एक टीस्पून साखर, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीरकृती- सगळ्यात आधी मक्याच्या कणसाची सालं काढून घ्या.
अमेरिकन कॉर्न नव्हे, खा पांढरा देशी मका; त्याचे ५ जबरदस्त फायदे - त्यानंतर किसनीने मक्याचे कणीस किसून घ्या.- कढई गॅसवर तापायला ठेवा. त्यात तेल टाका. तेल तापलं की जिरे, मोहरी, हिंग टाकून फोडणी करून घ्या.
- फोडणी झाल्यानंतर बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, किसलेले आले आणि मिरच्यांचे तुकडे टाकून परतून घ्या. त्यानंतर त्यात कढीपत्ता आणि शेंगदाणे टाकून परतून घ्या. चिमुटभर हळद टाका.- यानंतर मक्याच्या कणसाचा किस कढईत टाकून तो परतून घ्या.
आता करा बिनातेलाची पावभाजी! तेल- तूप- बटर घालण्याची गरजच नाही... तरी भाजी होईल चविष्ट आणि झटपट- त्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाका. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.- कढईवर झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे चांगली वाफ येऊ द्या. - वाफ आल्यावर कोथिंबीर टाकून गरमागरम मक्याचा उपमा सर्व्ह करा. - वरतून लिंबू पिळून किंवा दह्यासोबत हा उपमा अधिक चवदार लागतो.