केशर हा एक अत्यंत महागडा पदार्थ. त्यामुळे आपण तो अगदी जपून, माेजून- मापून वापरतो. खासकरून गोड पदार्थांसाठी केशराचा वापर हमखास केला जातो. थोडंसं जरी केशर घातलं तरी पदार्थांना येणारा स्वाद आणि रंग अतिशय अप्रतिम असतो. केशराचा मंद मंद दरवळणारा सुगंधच त्या पदार्थाचा गोडवा आणखी वाढवून टाकतो. पण बहुतांश लोक केशर चुकीच्या पद्धतीने वापरतात त्यामुळे त्यांच्या पदार्थांमध्ये कितीही केशर घातलं तरी ते सुगंधित होत नाहीत (how to use saffron or kesar correctly). शिवाय त्यांना छान रंगही येत नाही (best way to use kesar). म्हणूनच आता केशराचा वापर कसा करायचा याची योग्य पद्धत बघून घ्या. (Correct method of using saffron)
केशराचा वापर करण्याची योग्य पद्धत
बहुतांश घरांमध्ये जेव्हा केशर एखाद्या पदार्थामध्ये घालायचे असते तेव्हा केशराच्या काही काड्या पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत टाकल्या जातात आणि नंतर ते पाणी किंवा दूध त्या पदार्थामध्ये घातले जाते. पण यामुळे पदार्थांना केशराचा म्हणावा तसा सुगंध, चव आणि स्वाद येत नाही.
१६३ वीणकरांनी १९६५ तास मेहनत घेऊन तयार केली आलिया भटची साडी, बघा साडीची नजाकत...
पदार्थ अधिक रुचकर आणि चवदार होण्यासाठी केशराचा कसा वापर करावा, याविषयीचा एक व्हिडिओ nehadeepakshah या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
यामध्ये असं सांगितलं आहे की केशर वापरण्यापुर्वी ते मंद आचेवर अगदी काही सेकंदासाठी भाजून घ्या. ते तव्यावर किंवा कढईमध्ये तसंच भाजून घेण्यापेक्षा एखाद्या पेपर नॅपकिमध्ये गुंडाळा आणि मग तव्यावर ठेवून भाजा.
हिमोग्लोबिन वाढतच नाही? ४ गारेगार ज्यूस प्या, अशक्तपणा जाईल- अंगातलं रक्त वाढून ताकद येईल
यानंतर भाजलेलं केसर कुटून त्याची बारीक पावडर करा. एका वाटीमध्ये बर्फाचा एक तुकडा ठेवा. त्यावर तुम्ही तयार केलेली केशर पावडर टाका. बर्फ वितळल्यानंतर ते पाणी तुमच्या पदार्थामध्ये टाका. बघा यामुळे तुमच्या पदार्थाचा रंग आणि सुगंध दोन्हीही अतिशय उत्तम होईल. प्रयोग सोपा आहे. त्यामुळे कधीतरी करून पाहायला हरकत नाही.