जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची अनेकांना सवय असते. जेवणानंतर असे गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स आले की आपण मिळेल तो गोड पदार्थ लगेच तोंडात टाकतो. जेवणानंतर गोड म्हणून काहीजण चॉकलेट, मिठाई, आईस्क्रीम असे अनेक पदार्थ खाणे पसंत करतात. परंतु जेवणानंतर असे सतत गोड खाण्याची सवय आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही असे म्हणता येईल. या सतत गोड खाण्याच्या क्रेविंग्समुळे आपले वजन वाढू शकते त्याचबरोबर मधुमेहासारखे इतर आजार देखील होण्याची शक्यता असते. अशावेळी जेवणानंतर जर गोड खावेसे वाटले तर नेमके काय खावे असा प्रश्न आपल्याला पडतो(Craving Something Sweet? Make This Easy, Healthy Dessert At Home).
सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी, (Anshuka Parwani) हिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती जेवणानंतर जर गोड खाण्याचे क्रेविंग्स होत असतील तर लो कॅलरीज डार्क चॉकलेट चिया पुडिंग कसे करावे याची रेसिपी शेअर करत आहे. कित्येकांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते आणि हे गोड खाऊन वजनही वाढू नये असे वाटत असते. यासाठीच सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी हिने लो कॅलरीज डार्क चॉकलेट चिया पुडिंगची सोपी रेसिपी शेअर केली आहे. हे डार्क चॉकलेट चिया पुडिंग खाऊन आपले वजन वाढणार नाही आणि गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होईल. यासाठीच जेवणानंतर गोड खाण्याचे क्रेविंग्स होत असतील डार्क चॉकलेट चिया पुडिंग नक्की ट्राय करुन बघा(Try this ‘naturally high in protein’ dessert recipe to satiate your sugar cravings).
साहित्य :-
१. केळं - १ (पिकलेलं केळं मॅश करुन घेतलेले)
२. ग्रीक योगर्ट - २ टेबलस्पून
३. आल्मन्ड मिल्क - १/२ कप
४. चिया सीड्स - १ टेबलस्पून
५. व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट - १/२ टेबलस्पून
६. मध - १ टेबलस्पून
७. चॉकलेट सिरप - २ टेबलस्पून
८. मिक्स बेरीज - १/२ कप
वजन कमी करण्यासाठी ‘वॉटर फास्टिंग’? पाण्याचा उपवास-हा काय भलताच ट्रेण्ड -५ गोष्टी चुकल्या तर..
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये केळ्याचे काप घेऊन ते व्यवस्थित मॅश करुन घ्यावेत. हे मॅश करुन घेतलेल केळ बाऊलच्या तळाशी पसरवून घ्यावे.
२. त्यानंतर या मॅश केलेल्या केळ्याच्या लेअरवर ग्रीक योगर्ट घालून त्याची एक लेअर तयार करावी.
३. आता त्यात आल्मन्ड मिल्क (बदामाचे दूध) घालावे.
कॉफी प्यायल्याने छातीत जळजळ होते? लक्षात ठेवा ४ गोष्टी, अॅसिडीटी होईल कमी...
४. त्यानंतर या तयार मिश्रणात चिया सीड्स, व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट, मध, चॉकलेट सिरप असे एक एक जिन्नस घालूंन सगळ्यात शेवटी हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्यावे.
५. आता हे तयार झालेले डार्क चॉकलेट चिया पुडिंग एका ग्लासमध्ये भरुन घ्यावे. त्यानंतर या पुडिंगवर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुटसचे काप किंवा मिक्स बेरीज भुरभुरवून घालाव्यात.
६. आता हे पुडिंग सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये किमान २ तास तसेच ठेवून द्यावे.
डार्क चॉकलेट चिया पुडिंग खाण्यासाठी तयार आहे. जेवणांनंतर जर आपल्याला काही गोड खावेसे वाटले तर आपण हे लो कॅलरीज असणारे डार्क चॉकलेट चिया पुडिंग खाऊ शकता. हे खाल्याने एक्स्ट्रा कॅलरीज आपल्या शरीरात जाणार नाहीत तसेच, गोड खाल्ल्याचाही आनंद मिळेल.