Join us  

सतत काही न काही खाण्याची इच्छा होते? क्रेविंगसाठी ४ उत्तम पर्याय, मिटेल भूक - पोटात जाईल हेल्दी फूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 6:38 PM

4 Healthy Options for Cravings क्रेविंग भागवण्यासाठी आपण अनहेल्दी पदार्थ खातो, याने आरोग्याला हानी पोहचते. अशावेळी ४ पदार्थ खा..

खाण्याची क्रेविंग प्रत्येकाला होते. कोणाला जास्त होते तर कोणाला कमी होते. या क्रेविंगमुळे आपण अनहेल्दी पदार्थांचे सेवन करतो. खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण तळलेले, गोड, अथवा झटपट - रेडी टु इट असे पदार्थ खातो. या पदार्थांमुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. संपूर्ण आहार घेतल्यानंतर जर आपण क्रेविंगपोटी इतर पदार्थ खात असाल तर, आताच जिभेवर आळा घालणे उत्तम ठरेल. यासंदर्भात, डाएटिशियन गरिमा गोयल यांनी क्रेविंगपासून सुटका करण्यासाठी काही टिप्स इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

क्रेविंगला मॅनेज करण्यासाठी काही हॅक्स

ओट्स पुडिंग खा

ओट्स आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. जर आपल्याला छोटी भूक अथवा गोड खाण्याची क्रेविंग होत असेल तर, ओट्स पुडिंग तयार करून खा. त्यात ताजी फळे, ड्रायफ्रूट्स आणि खजूर घालून खा, हा एक उत्तम आरोग्यदायी पर्याय आहे.

खजूराने दूर करा गोड खाण्याची क्रेविंग

जर आपल्याला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर, अशावेळी खजूर खा. त्यातील फायबर आणि अँटीऑक्सिडेंट शरीरासाठी उपयुक्त आहेत. खजूरमध्ये भरपूर लोह असते, त्यात फ्रक्टोज आणि डेक्स्ट्रोज सारख्या अगदी साध्या शर्करा आढळतात, जे शरीरात त्वरित ऊर्जा भरते.

आईस्क्रीमऐवजी दही खा

आईस्क्रीमची क्रेविंग भरून काढण्यासाठी दही खा. दहीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि निरोगी प्रोबायोटिक बॅक्टेरियाचा समृद्ध स्रोत आहे. हे आतड्यांसोबतच हाडांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. दहीसोबत ताजी फळे खा याने अधिक फायदे मिळू शकेल.

कोल्डड्रिंक्स स्किप करा

कोल्डड्रिंक प्यायल्याने कोलेस्टेरॉल वाढते. त्यातील आर्टिफिशियल स्विटनर शरीरासाठी घातक मानले जाते. त्यामुळे घरगुती सरबत अथवा नारळ पाणी प्या.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य