हिवाळा सुरू झाला, या दिवसात अनेकांना चमचमीत, क्रिस्पी पदार्थ खाण्याची इच्छा होते. संध्याकाळची छोटी भूक भागवण्यासाठी घरात विविध पदार्थ ट्राय केले जातात. सध्या क्रिसमस आणि न्यू ईयरची चाहूल सगळ्यांना लागली आहे. सगळीकडे पार्टीचं नियोजन कसं करायचं? याचं प्लॅनिंग सुरू आहे. तुम्ही आपल्या पार्टीच्या स्टार्टरमध्ये पनीर पॉपकॉर्नचा समावेश करू शकता. पनीर सगळ्यांना आवडतो, पनीरला द्या कुरकुरीत ट्विस्ट.
पनीर पॉपकॉर्न बनवण्यासाठी लागणारं साहित्य
२५० ग्राम पनीर
अर्धा कप ब्रेडक्रम्स
अर्धा कप बेसन
अर्धा टीस्पून ओरिगॅनो
अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर
अर्धा टी स्पून काश्मिरी लाल तिखट
बेकिंग सोडा
मीठ
हळद पावडर
आलं लसूण पेस्ट
पाणी
ओवा
कृती
२५० ग्राम पनीरचे बारीक तुकडे करा. ते एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात काळी मिरी पावडर, काश्मिरी लाल तिखट, अर्धा टीस्पून ओरिगॅनो, चवीनुसार मीठ, ओवा, आणि धणे पावडर घालून मिक्स करा.
दुसरी वाटी घ्या. त्यात बेसन, हळद, थोडं बेकिंग सोडा, आले-लसूण पेस्ट आणि थोडी काश्मिरी लाल तिखट, ५-६ चमचे पाणी मिसळा. आणि मिक्स करा. मिश्रण घट्ट ठेवा. जेणेकरून पनीर क्रिस्पी बनतील.
आता या बेसनाच्या पेस्टमध्ये पनीर टाका. दुसऱ्या प्लेटमध्ये ब्रेडक्रम्स घ्या. त्यात बेसनात कोट करून घेतलेले पनीरचे तुकडे टाका. एका कढईत तेल गरम करून घ्या. आणि त्यात हे पनीरचे तुकडे तेलात सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्या. तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशाप्रकारे कुरकुरीत पनीर पॉपकॉर्न तयार. चटणी अथवा सॉससोबत खाऊ शकता.