Join us  

चिरलेला पालक-किसलेला बटाटा-करुन पाहा कुरकुरीत भजी, मस्त बरसत्या पावसात खमंग बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 1:28 PM

Crispy Aloo Palak Pakora Recipe - Spinach Potato Fritters बटाटा पालक भजींची ही चव तुम्ही कधी विसरणार नाही

पावसाळा सुरु झाला की खवय्यांची चंगळ सुरु होते. त्यात वाफाळता चहा आणि गरमागरम भजी हे कॉम्बिनेशन काही औरच आहे. भजी अनेक प्रकारची केली जाते. कांदा भजी, बटाटा भजी, मुग भजी, पालक भजी या भज्यांचे प्रकार आवडीने खाल्ले जातात. पण आपण कधी पालक - बटाटा भजी खाऊन पहिली आहे का?

पालक बटाट्याची भजी हे कॉम्बिनेशन थोडे हटके आहे. पालकातील आरोग्यदायी पोषण शरीरासाठी उपयुक्त ठरते, तर बटाट्यामुळे भजीची चव वाढते. जर आपण पालक बटाट्याची भजी कधी ट्राय करून पहिली नसेल तर, या पावसाळ्यात नक्कीच ट्राय करून पाहा. ही कुरकुरीत रेसिपी सर्वाना नक्की आवडेल(Crispy Aloo Palak Pakora Recipe - Spinach Potato Fritters).

पालक बटाट्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

पालक

बटाटा

हळद

हिंग

मीठ

हिरवी मिरची

लसणाच्या पाकळ्या

धणे

ओवा

१ वाटी पोह्यांची करा कुरकुरीत खमंग भजी! पाऊस - पोहे भजी आणि चहा, व्हा फ्रेश

बेसन

तांदळाचे पीठ

बेकिंग सोडा

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये पालक चिरून घ्या, त्यात एक किसलेला बटाटा, एक टेबलस्पून हळद, चिमुटभर हिंग, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. मिक्सरच्या भांड्यात ५ ते ६ मिरच्या घ्या, त्यात ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या, एक टेबलस्पून धणे, एक टेबलस्पून ओवा घालून पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट पालक - बटाट्याच्या बॅटरमध्ये घालून मिक्स करा.

१ कप ज्वारीच्या पिठाच्या करा खुसखुशीत वड्या, नाश्ता असा भारी की तोंडाला येईल चव

नंतर त्यात एक कप बेसन, एक टेबलस्पून तांदळाचे पीठ, चिमुटभर बेकिंग सोडा व २ चमचे पाणी घालून हाताने मिक्स करा. दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार बॅटरचे भजी सोडून तळून घ्या. अशा प्रकारे पालक बटाट्याची कुरकुरीत भजी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स