Lokmat Sakhi >Food > क्रिस्पी बेबी कॉर्न पकोडा! पावसाळ्यात भजी तर खातोच, कॉर्न पकोडाही टेस्ट में बेस्ट!

क्रिस्पी बेबी कॉर्न पकोडा! पावसाळ्यात भजी तर खातोच, कॉर्न पकोडाही टेस्ट में बेस्ट!

पावसाळ्याच्या दिवसात वाफवलेले स्वीटकॉर्न किंवा भाजलेले मक्याचे कणिस तर आपण नेहमीच खातो. आता ही एक नवी रेसिपी ट्राय करून पहा.. बेबी कॉर्न पकोडा !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 08:32 PM2021-08-20T20:32:23+5:302021-08-20T20:34:40+5:30

पावसाळ्याच्या दिवसात वाफवलेले स्वीटकॉर्न किंवा भाजलेले मक्याचे कणिस तर आपण नेहमीच खातो. आता ही एक नवी रेसिपी ट्राय करून पहा.. बेबी कॉर्न पकोडा !!

Crispy baby corn pakoda recipe, monsoon special dish | क्रिस्पी बेबी कॉर्न पकोडा! पावसाळ्यात भजी तर खातोच, कॉर्न पकोडाही टेस्ट में बेस्ट!

क्रिस्पी बेबी कॉर्न पकोडा! पावसाळ्यात भजी तर खातोच, कॉर्न पकोडाही टेस्ट में बेस्ट!

Highlightsलहान मुलांसकट मोठ्या माणसांनाही आवडणारी डिश

बटाटा भजी, कांदा पकोडा, मिरची पकोडा असा मस्त पावसाळी बेत खवय्यांच्या रसना तृप्त करणारा असतो. भज्यांचा असाच एक आता चटपटीत प्रकार करून पहा. क्रिस्पी बेबी कॉर्न पकोडा. ही डिश लहान मुलांसकट मोठ्या माणसांनाही आवडणारी आहे. करायला अतिशय सोपी आणि खाण्यास तेवढीच रूचकर अशी ही डिश आहे. त्यामुळे विकेंडला ही एक खास रेसिपी नक्की ट्राय करा...

 

बेबी कॉर्न पकोडासाठी लागणारे साहित्य
१० ते १५ बेबी कॉर्न, ३ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, १ टेबलस्पून तांदळाचं पीठ, हळद, तिखट, धणे आणि जिरेपुड, अर्धा टिस्पून अद्रक- लसूण पेस्ट, लिंबू, मीठ आणि तेल. 

कसे करणार बेबी कॉर्न पकाेडा
- सगळ्यात आधी कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ आणि सगळे साहित्य एका बाऊलमध्ये टाकावे. 
- आता या मिश्रणात पाणी घालून पीठ सैलसर भिजवावे आणि चवीनुसार मीठ टाकावे. 
- मिश्रण भिजवणं होईपर्यंत कढईत तेल टाकून ते तापवून घ्यावे.


- आता आपण भिजवलेल्या पिठात बेबी कॉर्न टाकून घोळून घ्यावेत. बेबी कॉर्नला सगळीकडून पीठ लागलेले आहे, हे बघावे आणि मग कॉर्न मध्यम आचेवर तळून घ्यावेत. 
- गरमागरम कॉर्न पकोडा टोमॅटो सॉससोबत खाण्यास चवदार लागतात. 

 

Web Title: Crispy baby corn pakoda recipe, monsoon special dish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.