सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते. चहासोबत काहीतरी चटपटीत खायला अनेकांना आवडते. रोज चहा सोबत बिस्कीट, कुकीज खाऊन कंटाळा आला असेल तर, कोबीचे क्रिस्पी कबाब ही रेसिपी ट्राय करून पाहा. कोबीचे कबाब ही छोटी भूक भागवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
कोबीचे अनेक पदार्थ केले जातात. पण तेच - तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, कोबीचे कबाब ही रेसिपी ट्राय करून पाहा. कोबी हे फायबर, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे ए आणि के तसेच इतर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे आरोग्याला कोबीचे अनेक फायदे मिळतात. कोबीचे कुरकुरीत कबाब ही रेसिपी झटपट व कमी साहित्यात तयार होते. चला तर मग या क्रिस्पी पदार्थाची कृती पाहूयात(Crispy Cabbage Onion Snacks Recipe).
कोबीचे क्रिस्पी कबाब करण्यासाठी लागणारं साहित्य
कोबी
बेसन
तांदळाचं पीठ
१ वाटी बेसनपीठ फक्त हवं, घरीच करा कुरकुरीत कुरकुरे, विकतपेक्षा भारी-घरच्याघरी
आलं - लसूण - हिरवी मिरची पेस्ट
हळद
चिली फ्लेक्स
धणे पावडर
जिरं पावडर
काळी मिरी पावडर
गरम मसाला
लाल तिखट
चवीनुसार मीठ
पाणी
कांदा
कोथिंबीर
तेल
कृती
सर्वप्रथम, कोबी बारीक चिरून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा, आता १० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेऊन बाजूला ठेवा. मिक्सरचं भांडं घ्या, त्यात आलं, लसणाच्या पाकळ्या व हिरवी मिरची घालून बारीक पेस्ट तयार करा. १० मिनिटानंतर कोबीमधून अतिरिक्त पाणी काढून घ्या. आता त्यात आलं - लसूण - हिरवी मिरचीची पेस्ट घालून मिक्स करा.
त्यानंतर त्यात ३ टेबलस्पून तांदळाचं पीठ, २ टेबलस्पून बेसन, अर्धा चमचा हळद, १ टेबलस्पून चिली फ्लेक्स, एक टेबलस्पून धणे पावडर, एक टेबलस्पून जिरं पावडर, काळी मिरी पावडर, गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ, व पाणी घालून मिश्रण मिक्स करा.
कांदा चिरताना डोळ्यातून घळाघळा पाणी येतं? ५ उपाय, कांदा रडवणार नाही, बारीक चिरला जाईल
मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात एक बारीक लांब चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून मिक्स करा. पीठ तयार झाल्यानंतर हाताला पाणी लावून घ्या, व त्याचे छोटे - छोटे कबाब तयार करून घ्या. दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात कोबीचे कबाब घालून तळून घ्या. सोनेरी रंग आल्यानंतर कोबीचे क्रिस्पी कबाब एका भांड्यात काढून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत कोबीचे कबाब खाण्यासाठी रेडी.