Join us  

रिमझिम पावसात खा मस्त मुगाच्या डाळीची भजी, चवीला मस्त- पचायला हलकी, बघा खमंग रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2024 1:16 PM

How To Make Moong Dal Pakoda?: बेसनाची कांदा भजी नेहमीच खातो, आता यावेळी मुगाच्या डाळीची खमंग भजी करून बघा....(moogachya dalichi bhaji recipe in marathi)

ठळक मुद्दे मुगाच्या डाळीमध्ये प्रोटीन्सही भरपूर असतात. त्यामुळे यंदा रिमझिम पावसात मुगाच्या डाळीची खमंग, कुरकुरीत भजी करूनच पाहा...

पाऊस आला की आपोआपच खमंग, चटपटीत काहीतरी खावं वाटतं. त्यामुळेच तर जेव्हा बाहेर रिमझिम पाऊस असतो आणि घरात सगळी मंडळी असतात, त्यावेळी मग गरमागरम भजी करण्याची फर्माइश आपोआपच येते. अशावेळी दरवेळी बेसनाची भजी करण्यापेक्षा चवीत थोडा बदल आणि पोटाला आराम म्हणून मुगाच्या डाळीची भजी करून पाहा. ज्यांना बेसन पचत नाही, त्यांच्यासाठी मुगाच्या डाळीची भजी हा एक मस्त पर्याय आहे (how to make moong dal pakoda?). शिवाय मुगाच्या डाळीमध्ये प्रोटीन्सही भरपूर असतात. त्यामुळे यंदा रिमझिम पावसात मुगाच्या डाळीची खमंग, कुरकुरीत भजी करूनच पाहा...(crispy, crunchy moong dal pakoda recipe)

मुगाच्या डाळीची भजी करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ वाटी मुगाची डाळ

पाव कप रवा

१ टेबलस्पून आलं, लसूण, मिरची पेस्ट

पावसाळ्यात बटाट्याला खूपच लवकर कोंब येतात, असे बटाटे खावेत का? वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला...

१ टीस्पून धने पूड

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

एक लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा

चवीनुसार मीठ

 

कृती 

सगळ्यात आधी मुगाची डाळ २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर ती ३ ते ४ तास भिजत घाला.

यानंतर भिजवलेली मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्या. हे पीठ जास्त पातळ करू नये. घट्ट ठेवावे. कारण तुम्ही पीठ पातळ केले तर भजी तळण्यासाठी जास्त तेल लागेल, शिवाय भजी कुरकुरीत होणार नाहीत.

पावसाळ्यात साप घरात येण्याची भीती वाटते? ३ उपाय करा, साप घराच्या आसपासही फिरकणार नाही

आता मुगाच्या डाळीच्या पिठामध्ये रवा, मीठ, धणे पूड, जिरे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा असं सगळं टाका आणि सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या.

यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवा आणि तेल कडक झालं की त्यात भजी तळून घ्या. मुगाच्या डाळीची भजी मध्यम आचेवर छान सोनेरी रंगाची होईपर्यंत तळावीत. जेणेकरून भज्यांना कुरकुरीतपणा येईल.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती