Join us  

१० मिनिटांत करा क्रिस्पी- क्रंची पनीर कुरकुरे... कुणाल कपूर यांची खास रेसिपी- एकदा खाऊन बघाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2023 9:11 AM

Food And Recipe: पनीरची भाजी, पनीर पकोडे, पनीर चिली हे आपले नेहमीचेच पदार्थ. आता क्रिस्पी- क्रंची असे पनीर कुरकुरे करून पाहा (Paneer Kurkure Recipe)..

ठळक मुद्देपनीरचे तेच ते पदार्थ करण्यापेक्षा पनीर कुरकुरे हा एक चटकदार पदार्थ करून पाहा. करायला अगदी सोपा आणि शिवाय झटपट होणारा....

पनीर हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या आवडीचा पदार्थ. त्यामुळे पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या, पनीर पराठे, पनीर पकोडे आपण नेहमीच करतो. शिवाय पनीर पौष्टिक असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी पनीरचे वेगवेगळे पदार्थ करण्यावर अनेकांचा भर असतो. आता पनीरचे तेच ते पदार्थ करण्यापेक्षा पनीर कुरकुरे हा एक चटकदार पदार्थ करून पाहा. करायला अगदी सोपा आणि शिवाय झटपट होणारा (paneer kurkure in just 10 minutes). ही रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे. त्यामुळे ती एकदा नक्कीच खाऊन पाहायला हवी.(delicious starter recipe by celebrity chef Kunal Kapur)

 

पनीर कुरकुरे करण्याची रेसिपी

साहित्य 

२०० ग्रॅम पनीर

१ टीस्पून हळद

चवीनुसार लाल तिखट आणि मीठ

उगवली शुक्राची चांदणी! पाहा पांढऱ्या साडीतले ‘क्लासी’ लूक!

अर्धा टेबलस्पून कसूरी मेथी

१ टीस्पून ओवा

१ टीस्पून चाट मसाला

१ टीस्पून गरम मसाला

२ टेबलस्पून कोथिंबीर

डोक्यावरून घेतलेला पदर-ओढणी सारखी सटकते? पदर डोक्यावर घेताना लक्षात ठेवा १ सोपा उपाय

१ टेबलस्पून आलं- लसूण पेस्ट

२ कप कॉर्न फ्लेक्स

२ कप बेसन पीठ

तळण्यासाठी तेल

 

कृती

१. सगळ्यात आधी पनीरचे उभे काप करून घ्या.

२. पनीरचे काप एका भांड्यात घ्या आणि त्यावर मीठ, तिखट, कोथिंबीर, चाट मसाला टाकून ते घोळून घ्या. हे मिश्रण पनीरला व्यवस्थित लागले पाहिजे.

दिवाळीसाठी घ्या १००० रुपयांपेक्षाही कमी किमतीत पूर्ण मेकअप किट! प्रायमर ते लिपस्टिक-मिळेल सगळं

३. आता एका मोठ्या भांड्यात बेसन पीठ घ्या. त्यात ओवा, आलं- लसूण पेस्ट, कसूरी मेथी, गरम मसाला, चाट मसाला आणि गरजेनुसार तिखट- मीठ टाका आणि पाणी टाकून भजी करायला भिजवतो तसे हे पीठ भिजवून घ्या

४. एका प्लेेटमध्ये कॉर्नफ्लेक्सचा चुरा करून ठेवा.

आईस फेशियल! त्वचा तरुण ठेवण्यासाठी स्वस्तात मस्त उपाय- पण करताना मात्र 'ही' गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर.....

५. आता आपण केलेले पनीरचे काप बेसन पीठात बुडवून घ्या. बेसन पीठ पनीरच्या तुकड्याला सगळीकडून लागलं की मग ते काप कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यात घोळवून घ्या. आता कढईमध्ये तेल तापवायला ठेवा आणि त्यात पनीरचे काप तळून घ्या. क्रिस्पी- क्रंची- कुरकुरीत पनीर कुरकुरे तयार... 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीकुणाल कपूर