Lokmat Sakhi >Food > कारल्याची कुरकुरीत भजी खाऊन तर पाहा, भर पावसात कारल्याची भजीही लागतील खमंग...

कारल्याची कुरकुरीत भजी खाऊन तर पाहा, भर पावसात कारल्याची भजीही लागतील खमंग...

Karela Pakoda Recipe : Crispy Karela Pakoda : कारल्याची भाजी नको म्हणणारे अतिशय चवीने खातील अशी खुसखुशीत कारली भजी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2024 08:13 AM2024-08-27T08:13:18+5:302024-08-27T08:17:53+5:30

Karela Pakoda Recipe : Crispy Karela Pakoda : कारल्याची भाजी नको म्हणणारे अतिशय चवीने खातील अशी खुसखुशीत कारली भजी....

Crispy Karela Pakoda Karela Pakoda Recipe How to make karela pakoda | कारल्याची कुरकुरीत भजी खाऊन तर पाहा, भर पावसात कारल्याची भजीही लागतील खमंग...

कारल्याची कुरकुरीत भजी खाऊन तर पाहा, भर पावसात कारल्याची भजीही लागतील खमंग...

'कडू कारल तुपात तळले, साखरेत घोळवले तरी कडू ते कडूच राहणार' अशी कारल्या बद्दलची म्हण आपल्याकडे फार लोकप्रिय आहे. कारले म्हटलं की, आपल्याकडे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच नाक मुरडतात. कारल्याची भाजी ताटात दिसताच सगळ्यांच्या कपाळावर आट्या पडतात. कारले चवीला कडू असल्याने बऱ्याच जणांना ते आवडत नाही. कारले चवीला जरी कडू असलं तरी आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असत(Crispy Karela Pakoda).

कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, फ्लेव्होनॉईड्स आणि इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या (Crispy Karela Fry) अनेक आरोग्य समस्या सहज दूर होतात. आपण कारल्याचा रस, कारल्याची भाजी तर खातोच पण कधी कारल्याची खुसखुशीत भजी खाल्ली आहे का ? किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात झटपट कारल्याची खुसखुशीत भजी कशी तयार करायची ते पाहूयात. कारल्याची खुसखुशीत भजी कशी तयार करायची याची कृती chinus.kitchen_या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे(Karela Pakoda Recipe).

साहित्य :- 

१. कारली - गरजेनुसार 
२. मीठ - चवीनुसार 
३. पाणी - गरजेनुसार 
४. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 
५. बेसन - १ टेबलस्पून 
६. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून
७. कॉर्नफ्लॉवर - १ टेबलस्पून
८. हळद - १/२ टेबलस्पून 
९. हिंग - चिमूटभर 
१०. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
११. तीळ - १ टेबलस्पून

मोड आलेल्या मुगाचा ढोकळा, ही घ्या कपभर मुगाची खास रेसिपी पौष्टिक ‘ग्रीन ढोकळा!’


फिल्टर नाही घरी, डोन्ट वरी! फिल्टर न वापरता ५ मिनिटांत करा फेसाळती फिल्टर कॉफी... 

कृती :- 

१. सर्वातआधी कारली स्वच्छ धुवून व पुसून घ्यावीत. 
२. आता कारल्याला बरोबर मध्ये उभा कट द्यावा, त्यानंतर बाजूला हलकेच उभे कट देत कारल्याला फुलांच्या पाकळ्यांसारखा आकार येईल. त्यानंतर कारल्याच्या आतील पांढरा भाग आणि बिया काढून घ्याव्यात.   
३. आता एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ व लिंबाचा रस घालून तो पाण्यांत हे दोन्ही पदार्थ मिक्स करुन घ्यावेत. 
४. त्यानंतर या तयार द्रावणात चिरून घेतलेली कारली ६ ते ७ तास बुडवून ठेवावीत, जेणेकरुन त्यांच्या कडवटपणा कमी होईल. 

५. आता एका बाऊलमध्ये बेसन, तांदुळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, हळद, हिंग, लाल तिखट मसाला, तीळ असे सगळे जिन्नस एकत्रित करुन त्या गरजेनुसार पाणी घालून त्याची भाज्यांना पीठ भिजवतो त्या कन्सिस्टंन्सीचे पीठ तयार करुन घ्यावे. 
६. आता कारली एक एक करुन या तयार पिठात घोळवा. 
७. एका कढईत तळण्यासाठी तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करुन घ्यावे. या गरम तेलात पिठात भजी प्रमाणे घोळवलेल कारलं कढईत सोडून खरपूस तळून घ्यावे. 

आपले खुसखुशीत कारलं खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Crispy Karela Pakoda Karela Pakoda Recipe How to make karela pakoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.