Join us  

१ वाटी चणाडाळीची करा कुरकुरीत खमंग ‘खारीडाळ’! चटकमटक खायचं असेल तर पाहा खारीडाळ कशी करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2023 2:50 PM

Crispy Masala Chana Dal, Best Snacks for Tea - Time विकतची खारीडाळ आपण खातोच, पण घरी खारीडाळ कशी करतात, पाहा रेसिपी

'रम्य ते बालपण' खरंच किती गमतीशीर असतं ना? बालपणीच्या अनेक गोष्टी आपण सगळेच मिस करतो. लहान असताना आपण प्रत्येकाने भातुकलीचा खेळ खेळला असेल. हा खेळ खेळत आपण मोठे कधी झालो हे कळलंच नाही. या सगळ्या गोष्टी मोठे झाल्यानंतर खूप आठवतात. शाळा सुटल्यानंतर आपण प्रत्येकाने आवळा, चिंच, बोरं हे पदार्थ मिटक्या मारत खाल्लेच असतील. यासह खारीडाळ देखील तितकीच फेमस होती.

२ रुपयांमध्ये मुठभर खारीडाळ मिळायची. कुरकुरीत खारीडाळ खूप चविष्ट लागायची. पण आपण कधी खारीडाळ ही रेसिपी घरी ट्राय करून पाहिलं आहे का? खारीडाळ करण्याची ट्रिक बहुतांश लोकांनाच ठाऊक आहे. जर आपल्याला घरच्या घरी खारीडाळ करून पाहायचं असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(Crispy Masala Chana Dal, Best Snacks for Tea - Time).

खारीडाळ करण्यासाठी लागणारं साहित्य

चणा डाळ

पाणी

बेकिंग सोडा

लाल तिखट

चाट मसाला

ग्लुकोज बिस्किटचे पेढे? बघा १० रुपयांत भन्नाट पेढ्याचा प्रकार, झटपट आणि मस्त

आमचूर पावडर

काळीमिरी पूड

मीठ

तेल

कृती

सर्वप्रथम, एक कप चणा डाळ चांगली निवडून धुवून घ्या. चणा डाळ धुतल्यानंतर त्यातून पाणी काढून घ्या. नंतर पुन्हा त्यात एक कप पाणी घाला. व त्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. त्यावर ४ तासांसाठी झाकण ठेवा. ४ तासानंतर त्यातून अतिरिक्त पाणी काढा. एक सुती कापड घ्या. त्यावर चणा डाळ पसरवून, त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या.

पुऱ्या टम्म फुगत नाहीत, फार तेल पितात? पीठ भिजवताना घाला १ पांढरी सिक्रेट गोष्ट

एका प्लेटमध्ये २ चमचे लाल तिखट, एक चमचा चाट मसाला, चिमुटभर आमचूर पावडर, काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात भिजलेली चणा डाळ घालून तळून घ्या. चणा डाळीला सोनेरी रंग आल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवा. डाळ गरम असतानाच त्यात तयार मसाला घालून हाताने मिक्स करा. अशा प्रकारे कुरकुरीत खारीडाळ खाण्यासाठी रेडी. आपण ही डाळ टी - टाईम स्नॅक्स म्हणून खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स