Lokmat Sakhi >Food > चटकमटक खायचं तर करा कमी तेलातली खमंग मूगभजी, फार तेल न वापरताही भजी होतील कुरकुरीत

चटकमटक खायचं तर करा कमी तेलातली खमंग मूगभजी, फार तेल न वापरताही भजी होतील कुरकुरीत

Crispy Moong Dal Pakora Recipe : मुगाच्या डाळीची भजी नाश्त्याला खाण्यासाठी किंवा दुपारच्या, रात्रीच्या जेवणाला तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 01:35 PM2023-09-04T13:35:34+5:302023-09-04T15:07:44+5:30

Crispy Moong Dal Pakora Recipe : मुगाच्या डाळीची भजी नाश्त्याला खाण्यासाठी किंवा दुपारच्या, रात्रीच्या जेवणाला तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Crispy Moong Dal Pakora Recipe : How to make Moong Dal Pakoda Recipe | चटकमटक खायचं तर करा कमी तेलातली खमंग मूगभजी, फार तेल न वापरताही भजी होतील कुरकुरीत

चटकमटक खायचं तर करा कमी तेलातली खमंग मूगभजी, फार तेल न वापरताही भजी होतील कुरकुरीत

जेवताना डाळ-भात आणि चपाती भाजी व्यतिरिक्त काहीतरी चमचमीत खायला असावं असं प्रत्येकालाच वाटतं. अशावेळी कटलेट, भजी किंवा वडे तुम्ही बनवू शकता. स्वयंपाकासाठी जास्तवेळ नसेल तर तुम्ही अगदी कमीत  कमी वेळात भजी बनवू शकता. (Moong Dal Pakoda Recipe) मुगाच्या डाळीची भजी नाश्त्याला खाण्यासाठी किंवा दुपारच्या, रात्रीच्या जेवणाला तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. (Crispy Moong Dal Pakora) फक्त भजी बनवण्याच्या ४ ते ५ तास आधी  डाळ भिजवून ठेवावी  लागेल. मूग भजी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to make moong bhaji)

साहित्य

भिजवलेले मुगाची डाळ - दोन कप

हळद- एक टिस्पून

लाल तिखट- एक टिस्पून

धणे पावडर- एक टिस्पून

गरम मसाला- एक टिस्पूनर

जीरं- एक चमचा

चिरलेले कोथिंबीर- अर्धी वाटी

चिरलेल्या हिरव्या मिरच्या - ३ ते ४

आलं-लसूण पेस्ट- १ टिस्पून

मीठ- चवीनुसार

कृती

१) मुगाच्या डाळीची भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मुगाची डाळ रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी भिजवलेली मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात काढा. डाळ वाटल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. डाग जास्त बारीक दळू नका अन्यथा मिश्रणाला पाणी सुटू शकतं. जाडसर टेक्चर ठेवा. पण मुगाची डाळ व्यवस्थित बारीक झालेली असावी. जास्त जाड मिश्रण राहीलं तर भजी मऊ होत नाही.

२)  वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात एक चमचा मीठ,  एक चमचा हळद,  एक चमचे धणे पावडर, एक चमचा  जीरं, एक चमचा गरम मसाला, बारीक चिरलेल्या मिरच्या किंवा तुम्ही २ ते ३ मिरच्यांची पेस्टही घालू शकता. त्यात १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. जर तुम्हाला कोथिंबीर  आवडत असेल तर प्रमाण वाढवू शकता. 

विकतसारखं घट्ट दही घरीच करा; १ गोष्ट मिसळा-वड्या पडतील असं दही बनेल

३) १ चमचा आलं-लसणाची पेस्ट घाला. सर्व जिन्नस घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने भजी घाला. भजी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्या. भजी तळत असताना गॅस उच्च आचेवर ठेवा. भजीचा रंग बदलल्यानंतर मंद आचेवर ठेवा. त्यानंतर एका एका ताटात काढून घ्या. तयार आहे गरमागरम मूग भजी

Web Title: Crispy Moong Dal Pakora Recipe : How to make Moong Dal Pakoda Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.