Join us

फक्त २ मिनिटांत करा मॅगीची भेळ, चहासोबत खाण्यासाठी मस्त चमचमीत पदार्थ, खा मनसोक्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 18:31 IST

Crispy Noodles Bhel Recipe : How To Make Noodles Bhel : Street Style Noodles Bhel : टी टाईमला लागलेल्या छोट्या भुकेसाठी पटकन करा चमचमीत मॅगीची भेळ...

भेळ ही एक चटकदार स्नॅक्स रेसिपी आहे. संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळी आपल्याला भूक लागली तर आपण चाट प्रकारातील भेळ, शेवपुरी, रगडा पॅटिस यांसारखे पदार्थ आवडीने खातो. भेळ (Crispy Noodles Bhel Recipe) ही तशी अतिशय सोपी रेसिपी आहे. किमान १५ ते २० मिनिटात भेळ बनून तयार होते. कुरमुरे, फरसाण, बारीक शेव, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, गोड तिखट खजुराची चटणी, हिरव्या मिरचीची चटणी असे सगळे जिन्नस एकत्रित करून भेळ (How To Make Noodles Bhel) तयार केली जाते. परंतु आता बदलत्या काळानुसार भेळ तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. दोन मिनिटात होणारी मॅगी अनेकांच्या आवडीच्या पदार्थांच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर येते(Street Style Noodles Bhel).

मॅगी तशीच खाल्ली किंवा विविध प्रयोग करुन खाल्ली तरी छान लागते. मॅगी पकोडा, तडका मॅगी, पनीर मॅगी, मॅगीची पाणीपुरी असे विविध प्रकार आपण ऐकले आणि खाल्लेच असतील. या पदार्थांप्रमाणेच 'मॅगी भेळ' हा देखील एक नवीन प्रकार. संध्याकाळी भूक लागली, चहासोबत काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर मॅगी भेळ हा मस्त प्रकार आहे. चहा उकळेपर्यंत मॅगी भेळ करुन होते, इतक्या झटपट होणारा हा भेळेचा खास नवीन प्रकार करुन तर पाहा.

साहित्य :-

१. बटर - १ टेबलस्पून २. कच्चे नूडल्स - १ पाकीट ३. मॅग्गी नूडल्स मसाला - १ टेबलस्पून ४. कांदा - १/४ कप (बारीक चिरलेला)४. टोमॅटो - १/४ कप (बारीक चिरून घेतलेला)५. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)६. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ७. चाट मसाला - १ टेबलस्पून ८. शेंगदाणे - १/२ कप (सालं काढून कोरडे भाजलेले)९. मीठ - चवीनुसार१०. चिली सॉस - १ टेबलस्पून ११. टोमॅटो केचअप - १ टेबलस्पून १२. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)१३. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 

'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनच्या पत्नीचा आवडता पदार्थ, वजन करतो कमी -पाहा चविष्ट रेसिपी...

मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी १० पदार्थ, प्रोटीन भरपूर-खाऊन मुलं होतील गुटगुटीत! सकाळच्या घाईत झटपट रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका पॅनमध्ये बटर घेऊन त्यात हाताने हलकेच क्रश केलेले न्यूडल घालावेत. हे न्युडल्स बटरमध्ये व्यवस्थित घोळवून हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावेत. २. त्यानंतर त्याच पॅनमध्ये सालं काढलेले शेंगदाणे घालून हलकेच परतून घ्यावेत. ३. आता एका मोठ्या बाऊलमध्ये, बटरमध्ये परतून घेतलेले न्युडल्स आणि शेंगदाणे घालावेत. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, चाट मसाला, मॅगी मसाला घालावा. आता सगळे जिन्नस एकत्रित चमच्याने हलवून मसाले मिक्स करुन घ्यावेत.  

मूठभर शेवग्याच्या पानांची चटणी करा, चमचाभर चटणी देते हाडांना ताकद भरपूर - पाहा रेसिपी... 

४. आता यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चिली सॉस, टोमॅटो केचअप, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लिंबाचा रस घालावा. ५. सगळ्यांत शेवटी हे सगळे जिन्नस चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावेत. 

चटपटीत क्रिस्पी नूडल्स भेळ खाण्यासाठी तयार आहे. आपण ही भेळ, पुरीसोबत खाण्यासाठी देखील सर्व्ह करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृती