हिरव्या पालेभाज्या बाराही महिने खायला हव्याच. पालक, मेथी, शेपू, या हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी उत्तमच. मात्र काहींना पालक आवडते तर काहींना अजिबात आवडत नाहीत. मात्र पालेभाज्या अतिशय पौष्टिक असतात, खायलाच हव्यात. पालक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
त्यामध्ये कॅल्शियम, सोडियम, कलोरीन, फॉस्फरस, लोह, खनिज प्रोटीन, आयर्न, विटामीन सी, विटामीन ए भरपूर मात्रामध्ये आढळते. आपण पालकाचे अनेक पदार्थ करतो. पालकाची भाजी, पालकाची भजी, पालक पनीर, पालक सूप, पण आपण कधी पालक वडी ही रेसिपी ट्राय करून पाहिली आहे का? पालक वडी करण्यासाठी खूप सोपी आहे. व चवीलाही उत्कृष्ट लागते. चला तर मग या क्रिस्पी पदार्थाची कृती पाहूयात(Crispy Palak Vadi | Easy Snacks Recipe ).
पालकाची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य
पालक
बेसन
तांदळाचे पीठ
आलं - लसूण - हिरवी मिरची पेस्ट
हिंग
हळद
लाल तिखट
नूडल्स, फ्राइड राइसही लगदा होवून पॅनला चिकटतात? शेफ कुणाला कपूर सांगतात १ सोपा उपाय
धणे पूड
गरम मसाला
ओवा
सफेद तीळ
मीठ
तेल
कृती
सर्वप्रथम, पालक स्वच्छ धुवून घ्या. व पानातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. आता चाकूच्या मदतीने पालक बारीक चिरून घ्या. त्यात आलं - लसूण - हिरवी मिरची पेस्ट, बेसन, तांदळाचे पीठ, चिमुटभर हिंग, हळद, लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला, ओवा, सफेद तीळ, चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्स करा.
साहित्य मिक्स केल्यानंतर त्यात थोडे पाणी घालून घट्ट पीठ तयार करून घ्या. पीठ तयार झाल्यानंतर हाताला तेल लावा व चाळणीला देखील तेल लावून ग्रीस करा. आता पालकाच्या पीठाचे लांबट गोळे तयार करा, व चाळणीवर ठेवा. इडलीच्या भांड्यात किंवा वाफेवर तयार पालकाच्या मिश्रणाला वाफवून घ्या. पालकाचे मिश्रण वाफवून झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा, व त्यानंतर त्याची वडी कापून घ्या.
भजी फार तेलकट होतात? ४ उपाय - भजी तेल पिणार नाहीत - होतील खमंग
दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात वड्या घालून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत पालकाची वडी खाण्यासाठी रेडी.