Lokmat Sakhi >Food > Crispy Paneer Pakora : चहाबरोबर खायला फक्त १० मिनिटात करा क्रिस्पी पनीर पकोडा; ही घ्या रेसेपी

Crispy Paneer Pakora : चहाबरोबर खायला फक्त १० मिनिटात करा क्रिस्पी पनीर पकोडा; ही घ्या रेसेपी

Crispy Paneer Pakoda : ) घरात एखादा पाहुणा आला असेल आणि लवकर नाश्ता करायचा असेल. तर पनीर पकोडे लगेच तयार होतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 03:59 PM2022-08-07T15:59:47+5:302022-08-07T16:13:01+5:30

Crispy Paneer Pakoda : ) घरात एखादा पाहुणा आला असेल आणि लवकर नाश्ता करायचा असेल. तर पनीर पकोडे लगेच तयार होतील.

Crispy Paneer Pakoda : How to make Crispy Paneer Pakodas for breakfast in just 10 minutes | Crispy Paneer Pakora : चहाबरोबर खायला फक्त १० मिनिटात करा क्रिस्पी पनीर पकोडा; ही घ्या रेसेपी

Crispy Paneer Pakora : चहाबरोबर खायला फक्त १० मिनिटात करा क्रिस्पी पनीर पकोडा; ही घ्या रेसेपी

संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत, कुरकुरीत पदार्थ खावा असं प्रत्येकाला वाटतं. नेहमी नेहमी कांदा, बटाटा भजी बनवण्यापेक्षा तुम्ही कधीतरी नवा बदल म्हणून पनीर भजी ट्राय करू शकता. पनीर पकोडा सर्वांनाच आवडतो आणि काही मिनिटांत तयार होतो. (Paneer Pakoda) घरात एखादा पाहुणा आला असेल आणि लवकर नाश्ता करायचा असेल. तर पनीर पकोडे लगेच तयार होतील. तसेच, तुम्ही ते कोणत्याही होम पार्टीमध्ये स्टार्टर म्हणून ठेवू शकता. समजून घेऊया पनीर पकोडे बनवण्याची पद्धत. (How to make Paneer Pakoda)

साहीत्य

शंभर ग्रॅम पनीर,

एक वाटी बेसन,

अर्धा चमचा ओवा

लाल तिखट,

चाट मसाला,

गरम मसाला,

चिमूटभर हिंग,

चवीनुसार मीठ,

तळण्यासाठी तेल,

चिली सॉस.

कृती

सर्व प्रथम बेसन गाळून पीठ बनवा. बेसनाच्या पिठात मीठ घालून मिश्रण बनवा. लाल तिखट, ओवा, चिमूटभर हिंग, गरम मसाला, चाट मसाला आणि एक चमचा एकत्र मिक्स करा. आता या बेसनाच्या मिश्रणात हळूहळू पाणी घालून पीठ बनवा. कोटींगसाठी तुम्ही जे पीठ बनवाल त्यात गुठळ्या असता कामा नये. 

पनीरला  चौकोनी किंवा डायमंड आकारात कापून घ्या. हे तुकडे थोडे जाड ठेवा. आता या सर्व तुकड्यांच्या मधोमध थोडंसं  चीरून करून त्यात हिरवी चटणी किंवा चिली सॉस भरा. यामुळे पकोडे मसालेदार आणि स्वादिष्ट होतील. फक्त गॅसवर पॅन ठेवा. नंतर त्यात तेल घालून गरम करा.

तेल गरम झाल्यावर पनीरचे तुकडे बेसनाच्या पिठात घोळवून चांगले तळून घ्या. नंतर हे पनीरचे तुकडे हाताने किंवा चमच्याने तेलात टाका. मग पलटून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा. काही मिनिटांत तयार होतील पनीर पकोडे.

Web Title: Crispy Paneer Pakoda : How to make Crispy Paneer Pakodas for breakfast in just 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.