Join us  

मस्त बरसणाऱ्या पावसात करा गरमागरम पनीर पॉपकॉर्न ! शनिवार-रविवारसाठी स्पेशल चमचमीत, विकेंड झक्कास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2024 1:46 PM

HEALTHY PANEER POPCORN : How To Make Paneer Popcorn At Home : हॉटेलमध्ये महाग किंमतीला विकला जाणारा हा पनीरचा स्टार्टर झटपट बनवा घरच्याघरीच, पनीरचा लज्जतदार स्टार्टर...

पनीर हा तसा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. मग ती पनीरची भाजी असो किंवा पनीर पराठा... शाकाहारी लोकांच्या जेवणाचा मुख्य भाग असलेले पनीर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला आवडते. आपण हॉटेलमध्ये गेल्यावर हमखास पनीरचे एक तरी स्टार्टर (Quick Starter Recipe) मागवतोच. पनीर ६५, पनीर कोफ्ता, पनीर लाबाबदार, पनीर टिक्का, पनीर चिली असे पनीरच्या स्टार्टरचे अनेक प्रकार आपण खातो(Paneer Popcorn Recipe - Quick & Easy Veg Starter Recipe)

पनीर हा एक असा पदार्थ आहे की तो कोणत्याही प्रकारच्या मसाल्यात घोळवला की तो त्या मसाल्यांची चव घेऊन अधिक स्वादिष्ट लागतो. आपल्या घरी काही खास सण, समारंभ, प्रसंग असला की आपण हमखास पनीरचे अनेक पदार्थ जेवणात बनवतो. स्टार्टरमध्ये आपण पनीरचे अनेक पदार्थ घरच्या घरी अगदी सहजपणे बनवू  शकतो. पनीर पॉपकॉर्न हा त्यापैकीच एक खास पदार्थ. आता आपण घरच्या घरी देखील पनीरचे झटपट होणारे स्टार्टर बनवू शकतो. पनीर पॉपकॉर्न बनवण्याची सोपी कृती पाहुयात(How To Make Paneer Popcorn At Home).    

साहित्य :- 

१. गव्हाचे पीठ - १/४ कप २. कॉर्नफ्लॉवर - १/४ कप ३. कश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ४. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून ५. चाट मसाला - १ टेबलस्पून ६. गरम मसाला - १/२ टेबलस्पून ७. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून ८. मीठ - चवीनुसार ९. पाणी - ५ कप १०. तेल - तळण्यासाठी ११. पनीर - ३०० ग्रॅम १२. कॉर्नफ्लेक्स - १ कप 

कांदा भजी नेहमीचीच, कांद्याच्या पातीची भजी कधी खाल्ली आहेत? खा कुरकुरीत कांदापातीची भजी...

दुधीची भाजी खायला नको म्हणणारे सुद्धा दुधीचे थालीपीठ खाऊन करतील फस्त ! ब्रेकफास्टसाठी सोपा पर्याय... 

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, कश्मिरी लाल मिरची पावडर, आलं - लसूण पेस्ट, चाट मसाला, गरम मसाला, काळीमिरी पूड व चवीनुसार मीठ घालावे. २. आता या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून मध्यम कन्सिस्टंन्सीचे बॅटर बनवून घ्यावे. ३. पनीरचे छोटे छोटे चौकोनी क्युबसारखे तुकडे करून घ्यावेत.  ४. आता हे पनीरचे तुकडे तयार केलेल्या बॅटरमध्ये घोळवून घ्यावेत. 

धो - धो कोसळणाऱ्या पावसात खा कॉर्न चाटचे ३ नवीन प्रकार, मसालेदार मक्याच्या दाण्यांची सोपी रेसिपी... 

५. एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लेक्स घेऊन त्याचा हलकासा चुरा करून घ्यावा. ६. बॅटरमध्ये पनीर घोळवून घेतल्यानंतर हे पनीर पुन्हा एकदा चुरा केलेल्या कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवून घ्यावे. ७. एका कढईत तेल व्यवस्थित गरम करून आता हे पनीरचे तुकडे त्यात सोडून खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.

पनीर पॉपकॉर्न गरमागरम स्टाटर्स खाण्यासाठी तयार आहे, हे पनीर पॉपकॉर्न सॉस किंवा मेयॉनीज सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

टॅग्स :अन्नपाककृती