Lokmat Sakhi >Food > फक्त थेंबभर तेलात तळा पापड! भरपूर तेल नसेल तरी कुरकुरीत पापड तळण्याची नवी युक्ती...

फक्त थेंबभर तेलात तळा पापड! भरपूर तेल नसेल तरी कुरकुरीत पापड तळण्याची नवी युक्ती...

Crispy papad fry with a only 1 Drop of Oil : Easy way of making crispy papad : How to fry papad in less oil : पापड तळण्यासाठी आता कढईत भरपूर तेल ओतण्याची गरज नाही, फक्त वापरा ही कमाल आयडिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 07:22 AM2024-10-12T07:22:00+5:302024-10-12T07:23:33+5:30

Crispy papad fry with a only 1 Drop of Oil : Easy way of making crispy papad : How to fry papad in less oil : पापड तळण्यासाठी आता कढईत भरपूर तेल ओतण्याची गरज नाही, फक्त वापरा ही कमाल आयडिया...

Crispy papad fry with a only 1 Drop of Oil Easy way of making crispy papad How to fry papad in less oil | फक्त थेंबभर तेलात तळा पापड! भरपूर तेल नसेल तरी कुरकुरीत पापड तळण्याची नवी युक्ती...

फक्त थेंबभर तेलात तळा पापड! भरपूर तेल नसेल तरी कुरकुरीत पापड तळण्याची नवी युक्ती...

आपल्या भारतीय परंपरेत जेवणाच्या ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आणि पापड असतात. रोजच्या जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून पापड, लोणची, चटण्या असे अनेक पदार्थ आपण आवडीने खातो. काहीवेळा जेवणाच्या ताटात आपल्या आवडीची भाजी नसली की आपण या तोंडी लावायला म्हणून वाढलेल्या चटण्या, पापड, लोणची यासोबत अगदी पोटभर जेवण करु शकतो. जेवणाच्या ताटातील पापड म्हणजे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. मग तो पापड तांदुळाचा असो किंवा उडीदाचा, गरमागरम कुरुरुम कुरुरुम पापड खायला सगळ्यांचं आवडतात. पापड हा एक असा पदार्थ आहे की जो आपण कधीही खाऊ शकतो. पापड तेलात तळून किंवा मग तव्यावर भाजून खाल्ला जातो. सध्या बरेचजण आपल्या हेल्थकडे लक्ष देताना कमी तळलेले पदार्थ खाणे पसंत करतात, म्हणून पापड कित्येकदा तळण्याऐवजी भाजला जातो. परंतु भाजलेल्या पापडापेक्षा तळलेल्या पापडाची चव आणखीनच छान लागते आणि तो खायलाही मजा येते(Crispy papad fry with a only 1 Drop of Oil).

पापड तळायच म्हटलं की आपल्याला कढईत भरपूर प्रमाणात तेल घ्यावं लागत. याचबरोबर काहीवेळा आपल्याला अगदी फार नाही दोन ते तीनच पापड हवे असतात. अशावेळी फक्त हे दोन ते तीन पापड तळण्यासाठी कढईत तेल ओतावे लागते. मग हे तेल उरतं आणि वाया जात. अशावेळी पापड तळण्यासाठी आपण एक भन्नाट आयडिया वापरु शकता. यामुळे अगदी कमी तेलात (How to fry papad in less oil) पापड तळून होईल व आपल्याला कढईत भरपूर प्रमाणात तेल घेण्याची गरजही नाही लागणार. यासाठी पापड तळण्याची ही नवी ट्रिक पाहूयात(Easy way of making crispy papad).  

कमी तेलात पापड कसा तळावा... 

पापड तळण्यासाठी भरपूर प्रमाणात तेल लागत. काहीवेळा आपल्याकडे तेल संपत आलेले असते किंवा अगदी २ ते ३ पापड तळण्यासाठी कढईत तेल कशाला ओता. यासाठी एखादी झटपट ट्रिक वापरुन पापड तळता आले तर किती सोपं आणि पटकन काम होईल. यासाठीच आपण अगदी थेंबभर तेलात पापड कसे तळावेत ते याची एक ट्रिक पाहूयात. 

कटलेट्स-पॅटिस क्रिस्पी -कुरकुरीत आणि चविष्ट हाेण्यासाठी ६ उपाय, गार झाल्यावरही मऊ पडणार नाहीत...

दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता पटकन होणाऱ्या इन्स्टंट बासुंदीची सोपी रेसिपी, दाटसर - गोड बासुंदीचा परफेक्ट बेत...

पापड तळण्यासाठी कढईत भरपूर तेल ओतण्यापेक्षा एका लहानशा वाटीत थोडं तेल घेऊन ते चमच्याच्या किंवा ब्रशच्या मदतीने पापडाला दोन्ही बाजूंनी लावून घ्यावे. त्यानंतर पापड एका चिमट्यात पकडून तो गॅसच्या मध्यम फ्लेमवर धरुन दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्यावा. या सोप्या आणि झटपट ट्रिकमुळे पापड तळण्यासाठी कमी प्रमाणात तेल लागेल, याचबरोबर २ ते ३ पापड तळण्यासाठी कढईत तेल ओतत बसण्याची झंझट देखील करावी लागणार नाही. या ट्रिकमुळे आपण अगदी सहजपणे ४ ते ५ मिनिटांत पटकन कमी तेलाचा वापर करुन पापड तळू शकतो. अशाप्रकारे आपण ही एक सोपी ट्रिक वापरुन पापड तळल्यास तेलाची बचत तर होतेच सोबतच, जास्तीचे तेल आपल्याकडून खाल्ले जात नाही.

दसरा स्पेशल : हलवाईकडे मिळतो तसा फाफडा करा घरी-अस्सल गुजराथी फाफडा करण्याची सोपी रेसिपी...


     

Web Title: Crispy papad fry with a only 1 Drop of Oil Easy way of making crispy papad How to fry papad in less oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.