Lokmat Sakhi >Food > आषाढी एकादशी स्पेशल : बटाट्याचे फ्रेंच फ्राईज आवडतात, मग आता करा उपवासाचे पौष्टिक फ्रेंच फ्राईज...

आषाढी एकादशी स्पेशल : बटाट्याचे फ्रेंच फ्राईज आवडतात, मग आता करा उपवासाचे पौष्टिक फ्रेंच फ्राईज...

Ashadhi Ekadashi Special : Crispy & Perfect Fating French Fries Recipe : लहान मुलांचा उपवास असला की प्रश्न पडतो, त्यांना काय खायला द्यायचे, हे उपवासाचे फ्रेंच फ्राईज मुलांना नक्की आवडतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2024 03:47 PM2024-07-16T15:47:22+5:302024-07-16T15:56:25+5:30

Ashadhi Ekadashi Special : Crispy & Perfect Fating French Fries Recipe : लहान मुलांचा उपवास असला की प्रश्न पडतो, त्यांना काय खायला द्यायचे, हे उपवासाचे फ्रेंच फ्राईज मुलांना नक्की आवडतील.

Crispy & Perfect Fating French Fries Recipe homemade crispy perfect fasting french fries recipe | आषाढी एकादशी स्पेशल : बटाट्याचे फ्रेंच फ्राईज आवडतात, मग आता करा उपवासाचे पौष्टिक फ्रेंच फ्राईज...

आषाढी एकादशी स्पेशल : बटाट्याचे फ्रेंच फ्राईज आवडतात, मग आता करा उपवासाचे पौष्टिक फ्रेंच फ्राईज...

आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त उपवास करण्याची तयार सध्या बऱ्याच घरात सुरु असेल. या उपवासानिमित्त वेगवेगळे पदार्थ बनवून खाण्याची मज्जा काही औरच असते. शक्यतो हे उपवासाचे पदार्थ आपण नेहमी करून खात नाही त्यामुळे जेव्हा असे पदार्थ केले जातात तेव्हा त्यावर ताव मारला जातो. उपवासाच्या दिवशी साबुदाणा व बटाटा या मुख्य दोन पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करून पदार्थ बनवले जातात(homemade crispy perfect fasting french fries recipe).

बटाट्यापासून तयार केलेले फ्रेंच फ्राईज घरांतील सगळेच अगदी आवडीने खातात. फास्ट फूडमध्ये फ्रेंच फ्राईज हे स्नॅक्स लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच अतिशय आवडणारे असते. खायला कुरकुरीत,  चवीला उत्तम, झटपट होणारा हा पदार्थ अनेकांच्या घरी बनवला जातो. उपवासाच्या दिवशी आपण फक्त बटाट्याचा वापर करून फ्रेंच फ्राईज बनवतो. परंतु फक्त बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवण्यापेक्षा आपण त्यात इतरही पौष्टिक पदार्थ घालून उपवासाचे हेल्दी फ्रेंच फ्राईज बनवू शकतो. त्यामुळे यंदाच्या आषाढी एकादशीला उपवासाचे हे फ्रेंच फ्राईज नक्की ट्राय करुन पाहा(Crispy & Perfect Fating French Fries Recipe).

साहित्य :- 

१. बटाटे - ४ (उकडलेले बटाटे)
२. हिरव्या मिरच्या - ४ ते ६ 
३. जिरे - १ टेबलस्पून 
४. शेंगदाणा कूट - अर्धा कप 
५. साबुदाणा / वरीचे पीठ - ७ ते ८ टेबलस्पून 
६. मीठ - चवीनुसार
७. तेल - तळण्यासाठी 

आषाढी एकादशी स्पेशल : साबुदाण्याचे वडे नको नी खिचडी नको, फक्त १० मिनिटांत करा उपवासाचा पराठा...

उपवासाचे पदार्थ खाऊन पित्त होते, घ्या ५ पौष्टिक पारंपरिक पदार्थ- करा हेल्दी उपवास...

कृती :- 

१. हिरव्या मिरच्या व जिरे एकत्रित करून ते मिक्सरमध्ये बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यावे. 
२. आता उकडलेले बटाटे एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन ते कुस्करुन त्याचा लगदा करुन घ्यावा. आता त्यात हिरवी मिरची व जिऱ्याची वाटलेली पेस्ट घालावी. 
३. त्यानंतर या उकडलेल्या बटाट्याच्या मिश्रणात शेंगदाण्याचा कूट, वरईचेपीठ, साबुदाण्याचे पीठ घालून कणीक मळतो तसे पीठ मळून घ्यावे. 

४. सगळ्यात शेवटी या मळून घेतलेल्या पिठाला तेलाचा हात लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यावे. 
५. आता या तयार पिठाच्या फ़्रेंच फ्राईजच्या आकाराच्या परंतु थोड्या जाड व मोठ्या स्टिक्स हातांनी मळून तयार करुन घ्याव्यात. 
६. एका मोठ्या कढईत तेल गरम करत ठेवावे, या गरम तेलात हे फ्रेंच फ्राईज व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यावेत. 

उपवासाचे फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी तयार आहेत. हे फ्रेंच फ्राईज आपण दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

Web Title: Crispy & Perfect Fating French Fries Recipe homemade crispy perfect fasting french fries recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.