Join us  

पावसात चमचमीत खायला हवे, करा ५ मिनिटांत आलू क्रिस्पी ६५, मूडही होईल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2023 11:52 AM

Crispy Potato Fry..Simple yet very tasty/ Aloo Fry नाश्त्यात किंवा स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? ट्राय करा हटके आलू क्रिस्पी

नाश्ता म्हटलं की आज काय खावं किंवा आज काय नाश्त्याला बनवावं असा प्रश्न पडतो. नाश्त्यामध्ये अनेकांना पोहे, उपमा किंवा साउथ इंडियन डिश खायला आवडतात. पण अनेकदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अनेकदा स्नॅक्समध्ये काय खावं असा देखील प्रश्न पडतो. अशा वेळी आपण आलू क्रिस्पी ही रेसिपी ट्राय करून पाहू शकतो. बटाट्याचे आपण अनेक पदार्थ खाल्ले असतील. बटाटा म्हटलं की अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. जर आपल्याला नाश्ता किंवा स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर, बटाटे घ्या आणि चविष्ट आलू क्रिस्पी ६५ बनवायला सुरुवात करा(Crispy Potato Fry..Simple yet very tasty/ Aloo Fry).

आलू क्रिस्पी करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटे

कॉर्नफ्लोर

मैदा

आलं - लसूण पेस्ट

प्रवासात ‘रेल्वे कटलेट’ खायची मजाच भारी! घ्या रेल्वे कटलेटची सोपी-झटपट रेसिपी

मीठ

लाल तिखट

किचन किंग मसाला

चाट मसाला

रेड फूड कलर

पाणी

तेल

कडीपत्ता

हिरवी मिरची

कृती

सर्वप्रथम, बटाट्याचे चौकोनी काप करा. व ७० टक्क्यांपर्यंत बटाटे उकडून घ्या. उकडलेले बटाटे एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात दोन चमचे कॉर्नफ्लोर, एक चमचा मैदा, २ टेबलस्पून आलं - लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, एक चमचा लाल तिखट, एक चमचा किचन किंग मसाला, एक चमचा चाट मसाला, चिमुटभर रेड फूड कलर घालून साहित्य एकजीव करा. आपण त्यात गरजेनुसार पाणी देखील घालू शकता.

चिरलेला पालक-किसलेला बटाटा-करुन पाहा कुरकुरीत भजी, मस्त बरसत्या पावसात खमंग बेत

दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात हे बटाट्याचे चौकोनी काप सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. फोडणीच्या पळीत कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या तळून घ्या, व तयार आलू क्रिस्पीवर गार्निश करून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे आलू क्रिस्पी ६५ खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स