उन्हाळा सुरू होताच बटाट्याचे पापड, नाचणीचे, ज्वारीचे पापड बनवायला सुरूवात होते. हे पापड खायला कुरकरीत आणि चविष्ट असतात. वर्षभर टिकणारे बटाट्याचे पापड बनवण्यासाठी फार काही करावं लागत नाही. फक्त १५ ते २० बटाटे वापरून तुम्ही हे वेफर्स बनवू शकता. (Crispy potato wafers Recipe) हे वेफर्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. उपवासाच्या दिवशी फराळात खायला, मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खायला हे वेफर्स उत्तम पर्याय आहेत. चहा किंवा कॉफीसोबत तुम्ही या वेफर्सचा आस्वाद घेऊ शकता. (How to make Crispy Thin Potato Chips)
कृती
1) हे वेफर्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी बटाटे स्वच्छ धुवून घ्या.
2) बटाटे धुतल्यानंतर पाण्यात भिजवून ठेवा आणि आणि एकेक बटाट्याची सालं काढून घ्या.
3) सालं काढल्यानंतर एका मोठ्या भांड्यात पाणी, मीठ घालून द्रावण तयार करा.
4) त्यात बटाट्याचे बारीक काप करून घाला. हे काप उकळत्या पाण्यात शिजवून घ्या नंतर पाण्यातून काढून उन्हात १ ते २ दिवस सुकवायला ठेवा.
5) हे काप सुकल्यानंतर गरम तेलात तळून घ्या. वेफर्स ओलसर वाटत असतील तर पुन्हा उन्हात वाळवून घ्या.