Lokmat Sakhi >Food > न लाटता- न शिजवता १० मिनिटांत करा रव्याचे पापड; सोपी झटपट रेसिपी- खुसखुशीत रवा पापड

न लाटता- न शिजवता १० मिनिटांत करा रव्याचे पापड; सोपी झटपट रेसिपी- खुसखुशीत रवा पापड

Crunchy Suji ke Papad Instant Rava Papad Recipe : न लाटता, न शिजवता १० मिनिटांत रव्याचे पापड करण्याची सोपी रेसिपी या लेखात पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 03:53 PM2023-03-05T15:53:29+5:302023-03-06T12:38:29+5:30

Crunchy Suji ke Papad Instant Rava Papad Recipe : न लाटता, न शिजवता १० मिनिटांत रव्याचे पापड करण्याची सोपी रेसिपी या लेखात पाहूया.

Crunchy Suji ke Papad Instant Rava Papad Recipe : How to make rawa papad | न लाटता- न शिजवता १० मिनिटांत करा रव्याचे पापड; सोपी झटपट रेसिपी- खुसखुशीत रवा पापड

न लाटता- न शिजवता १० मिनिटांत करा रव्याचे पापड; सोपी झटपट रेसिपी- खुसखुशीत रवा पापड

उन्हाळ्याच्या दिवसात घराघरांत पापड बनवायला सुरूवात होते. पण पापड बनवणं काही सोपं काम नाही. सामानाचं गणित बिघडलं किंवा पापड व्यवस्थित सुकले नाही तर पूर्ण मेहनत वाया जाते. (Crunchy Suji ke Papad) पापड बिघडतात म्हणून काहीजणं पापड घरी बनवणं टाळतात. पापड लाटण्यात आणि शिजवण्यात बराचवेळ जातो. (Crunchy Suji ke Papad) न लाटता न,  शिजवता १० मिनिटांत रव्याचे पापड करण्याची सोपी रेसिपी या लेखात पाहूया. १ ते २ वाटी रवा वापरून तुम्ही वर्षानुवर्ष टिकणारे पापड बनवू शकता. (Instant Rava Papad)

झटपट तयार होणारे रव्याचे पापड करण्यासाठी सगळ्यात आधी वाटीभर रवा मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.  त्यात एक चमचा मैदा घाला. रवा आणि मैद्याचे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात २ सुक्या लाल मिरच्या बारीक करून घाला.  १ चमचा जीरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घाला. यात पाणी घालून एकसंथ मिश्रण तयार करा. हे मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त जाड असू नये. 

थंडगार, ताज्या कोकम सरबताची परफेक्ट रेसेपी; एकदा बनवा, उन्हाळा संपेपर्यंत पित राहा

हे पदार्थ एकत्र करून त्याचं मिश्रण  तयार करा. एका कढईत एक लिटर पाणी घालून हे पाणी उकळण्यासाठी ठेवा. या पाण्यावर जाळीचं झाकण ठेवून त्यावर लहान लहान झाकणांमध्ये हे मिश्रण घालून वाफवून घ्या. ज्या झाकणांवर तुम्ही पापड घालणार आहात त्याला आधी तेल लावून ग्रीस करून घ्या.  वाफवल्यानंतर  हे पापड सुकवायला ठेवा. १ ते २ दिवस उन्हात सुकवल्यानंतर हे पापड तळून पाहा. वर्षभरसाठी तुम्ही हे पापड साठवून ठेवू शकता.

Web Title: Crunchy Suji ke Papad Instant Rava Papad Recipe : How to make rawa papad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.