चांगल्या आरोग्यासाठी डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली असणं गरजेचं असतं. (Buttermilk Vs Curd) डाएटमध्येमध्ये दही, ताकाचा समावेश करून तुम्ही पचनक्रिया चांगली ठेवू शकता. दही आणि ताक यातलं काय जास्त फायदेशीर ठरतं असा प्रश्न अनेकांना पडतो. (Health Tips) काही लोक ताक पिणं पसंत करतात तर काहीजणांना दही आवडतं. दही प्यावं की ताक याबाबत अनेक लोक गोंधळात असतात. डॉ. सिनियर कंसल्टेंट भूषण भोले यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Buttermilk Vs Curd Which One Is Healthy Option)
ताक की दही सगळ्यात जास्त फायदेशीर काय? (Buttermilk Vs Curd)
दही एक डेअरी प्रोडक्ट आहे. दही प्रोबायोटिक्सचा एक चांगल स्त्रोत आहे. ज्यामुळे आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरियाज वाढतात आणि डायजेशन चांगले राहण्यास मदत होते. यामुळे पचनाशी संबंधित समस्या कमी होतात. शरीराचे तापमान मेंटेन राहते तर ताकाच्या सेवनाने डिहायड्रेशन कमी होते.
दातांच्या मध्यभागी किड-वरून पिवळे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात
जर तुमच्या शरीरात वॉटर लॉस जास्त झालं असेल तर ताकाचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. ताकामुळे पचनक्रिया चांगली राहते. एक्सपर्ट्सच्या मते या दोन्ही गोष्टी शरीराला उत्तम ठरतात पण ताक करण्याासाठी दही घुसळले जाते तेव्हा त्याची गुणवत्ता अधिक वाढते. ताकामधील प्रोटीनचे स्टॅक्चर बदलते ज्यामुळे अन्न सहज पचते.
दही आणि ताकाच्या सेवनाबाबत तज्ज्ञ काय सांगतात?
एक्सपर्ट्स सांगतात की हे दोन्ही पदार्थ तब्येतीसाठी फायदेशीर टरतात. वजन वाढवण्यासाठी दही फायदेशीर ठरतं तर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ताकाचे सेवन करा. दह्याच्या तुलनेत ताकात कमीत कमी कॅलरीज असतात. दही प्रोबायोटिक्स प्रादन करते तर ताक डिहायड्रेशनपासून बचाव करते.
या दोन्हींमुळे शरीराला बरेच फायदे मिळतात. दही आणि ताकाच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात या दोन्हीचे सेवन करताना क्वालिटी आणि क्वान्टिटीकडे लक्ष ठेवायला हवं. तुम्हाला कोणत्याही आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.