उन्हाळ्यात सर्वांच्याच घरी दह्याचं सेवन केलं जातं. दुपारच्या जेवणानंतर ताक किंवा दही खाल्ल्यानं तब्येत चांगली राहते इतकंच नाही तर आरोग्याच्या इतर समस्याही टाळता येतात. नेहमी बाहेरून आणलेलं दही खाणं योग्य नाही. घरी बनवलेले पदार्थ तुम्ही जितके खाल तितकेच निरोगी राहाल. (How to make curd or dahi at home) काहीजण ताक तर काहीजण साखर घालून दही आवडीनं खातात. (Curd making steps at home)
घरी दही व्यवस्थित लागत नाही, पातळ होतं, आंबट होतं. तर कधी विर्जण नसल्यानं दही बाहेरून आणण्याशिवाय पर्याय नसतो अशा अनेक तक्रारी घरोघरच्या स्त्रियांच्या असतात. घरच्याघरी परफेक्ट घट्ट दही कसं बनवायचं ते पाहूया. रात्री दही लावण्याच्या योग्य सोप्या स्टेप्स फॉलो केल्या तर सकाळी विकतसारखं ताजं, घट्ट दही तयार असेल.
ना मशिन, ना कन्डेंस मिल्क; घरीच फक्त दूध वापरून करा क्रिमी, थंडगार आईस्क्रीम; घ्या रेसिपी
दही बनवण्यासाठी सगळ्यात आधी फूल क्रिम दूध तापवण्यासाठी मध्यम आचेवर ठेवा. त्यात १ चमचा पाणी घाला. दुधाला उकळ आल्यानंतर गॅस बंद करा दूध हातानं सहज स्पर्श करता येईल इतकं थंड होऊ द्या. आता 1 चमचा दही दुधात घाला आणि 2-3 मिनिटे फेटून घ्या.
अर्धा कप भिजवलेले तांदूळ घ्या; १५ मिनिटात करा मऊ -जाळीदार ढोकळा; घ्या सोपी रेसेपी
हे फेटलेल्या मिश्रण तुम्ही ज्या भांड्यात दही लावणार आहात त्या भांड्याला लावा आणि त्यात गार झालेल दूध घाला. दूध घातल्यानंतर चमच्यानं एकदा ढवळून घ्या. नंतर या भांड्यावर पातळ कापडाचं झाकण ठेवा. त्यावर रबर किंवा दोरा बांधून भांडं बंद करा. ८ ते १० तासांनी दही तयार झालेलं असेल. हे दही तुम्ही कढी, दही वडा हे पदार्थ घरच्याघरी बनवण्यासाठीही वापरू शकता.