दही काय किंवा ताक काय, दोन्ही सारखेच आहेत. काहींना तर योगर्ट आणि दह्यातही लवकर फरक कळून येत नाही. पण खरंच दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत का? तर हो, जरी ताक हे दह्यापासून तयार होत असले तरी, याचे पौष्टिक घटक वेगळे आहेत. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? उत्तम पचनासाठी आपल्या आहारात दही आणि ताकाचा समावेश करावा असा सल्ला तज्ज्ञ देताता.
परंतु आरोग्यासाठी ताक चांगले की दही असा प्रश्न समोर येतो. जर आपण देखील ताक आणि दह्यात कन्फ्युज असाल तर, आपल्या आरोग्यासाठी कोणती गोष्टी योग्य राहील याची माहिती, पीएसआरआय हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. भूषण भोळे यांनी दिली आहे(Curd vs Buttermilk: Nutritional Differences and Choosing the best for your Health).
दही की ताक आरोग्यासाठी काय उत्तम?
दही हे दुग्धजन्य पदार्थ आहे. यासह प्रोबायोटिक्सचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. दही खाल्ल्याने आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांना प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. यासह पचनाच्या निगडीत असलेला त्रास कमी होतो. तर ताकामुळे शरीर हायड्रेट राहते. ताक हे दह्याचा वापर करून तयार केले जाते. याची चव आंबट असते. ज्यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
तज्ज्ञ सांगतात, 'पोटासाठी दही आणि ताक दोन्ही गोष्टी उत्तम मानल्या जातात. परंतु, ताक तयार करताना दह्यात पाणी घालून घुसळले जाते. ज्यामुळे त्यातील प्रोटीनचे स्ट्रक्चर बदलते. नियमित ताक प्यायल्याने खाल्लेले अन्न लवकर पचते.'
खास लग्नाच्या पंगतीसाठी करतात तशी चविष्ट कोबीची भाजी करा घरी, कोबी न आवडणारेही खातील चवीने
ते पुढे सांगतात, 'जर आपल्याला वजन वाढवायचं असेल तर, आहारात दह्याचा समावेश करा. जर वजन कमी करायचं असेल तर, नियमित ताक प्या. त्यात दह्यापेक्षा कमी कॅलरीज असतात. दही प्रोबायोटिक्स पुरवते, तर ताक शरीर हायड्रेट ठेवते. दही किंवा योगर्टपेक्षा ताक पचायला अधिक हलके असते. कफ, पित्त आणि वात या तिन्ही प्रकृतीच्या लोकांसाठी ताक फायदेशीर ठरतं. भूक न लागणे, झोप न येणे, ॲनिमिया असे त्रासही नियमित ताक प्यायल्याने कमी होतात.'