Lokmat Sakhi >Food > कडीपत्ता वाळून वाया जातो? वाटीभर कडीपत्त्याची करा तोंडी लावायला चविष्ट-हेल्दी चटणी...

कडीपत्ता वाळून वाया जातो? वाटीभर कडीपत्त्याची करा तोंडी लावायला चविष्ट-हेल्दी चटणी...

Curry Leaves Chutney Easy and healthy Recipe : केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेच्या सौंदर्याशी निगडीत समस्या दूर होण्यासही कडीपत्ता फायदेशीर ठरतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2023 11:24 AM2023-10-08T11:24:26+5:302023-10-08T11:50:18+5:30

Curry Leaves Chutney Easy and healthy Recipe : केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेच्या सौंदर्याशी निगडीत समस्या दूर होण्यासही कडीपत्ता फायदेशीर ठरतो

Curry Leaves Chutney Easy and healthy Recipe : Does the Curry Leaves dry out? Make a bowl of curry leaves into a tasty-healthy mouth-watering chutney... | कडीपत्ता वाळून वाया जातो? वाटीभर कडीपत्त्याची करा तोंडी लावायला चविष्ट-हेल्दी चटणी...

कडीपत्ता वाळून वाया जातो? वाटीभर कडीपत्त्याची करा तोंडी लावायला चविष्ट-हेल्दी चटणी...

भारतीय स्वयंपाकात पदार्थांना स्वाद आणि चव येण्यासाठी विविध प्रकारचे मसाले आवर्जून वापरले जातात. यामध्ये मिरी, लवंग, वेलदोडे, तमालपत्र, दालचिनी असा खडा मसाला आणि आलं, लसूण, कांदा, कडीपत्ता यांसारख्या ओल्या मसाल्याचाही आपण वापर करतो. अगदी उपमा, पोह्यापासून ते आमटी, कढीपर्यंत सगळ्याच पदार्थांना फोडणीत घालायला कडीपत्ता असेल तर पदार्थाला एक छान स्वाद येतो. केवळ स्वादासाठीच नाही तर पौष्टीकता वाढावी म्हणूनही हा कडीपत्ता उपयुक्त असतो. तो केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेच्या सौंदर्याशी निगडीत समस्या दूर होण्यासही कडीपत्ता फायदेशीर ठरतो. इतकेच नाही तर मायग्रेन, डोकेदुखी, डायबिटीस, थायरॉईड, तोंडाचा अल्सर, वजन कमी करणे, हार्मोन्सचे असंतुलन अशा विविध समस्यांवर कडीपत्ता उपयुक्त असतो (Curry Leaves Chutney Easy and healthy Recipe). 

(Image : Google )
(Image : Google )

हे सगळे जरी खरे असले तरी कडीपत्ता बाजारातून आणल्या आणल्या नीट ठेवला गेला नाही तर तो अगदी लगेचच वाळून जातो. बरेचदा अगदी ५ ते १० रुपयांना खूप कडीपत्ता दिला जातो अशावेळी त्याचे करायचे काय असा प्रश्न साहजिकच महिलांसमोर असतो. एकदा कडीपत्ता वाळून गेला की त्याचा  वास जातो आणि तो अजिबात चांगला लागत नाही. म्हणून त्याआधीच या कडीपत्त्याचा योग्य पद्धतीने वापर करायला हवा. त्यासाठीच पाहूयात रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट लागणारी आणि तितकीच पौष्टीक असलेली कडीपत्त्याची चटणी कशी करायची... 

१. एक वाटी कडीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून पूर्ण वाळवून घ्यायची किंवा कढईमध्ये कडक होईपर्यंत भाजायची. 

२. साधारण अर्धी ते पाऊण वाटी दाणे कढईत खरपूस भाजून घ्यायचे. 

३. हे दोन्ही मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये अर्धा चमचा तिखट, मीठ, अर्धा चमचा जीरे आणि ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या घालायच्या. 

४. मिक्सरमध्ये हे सगळे ओबडधोबड फिरवून घ्यायचे म्हणजे चविष्ट चटणी तयार होते.

५. हवाबंद डब्यात ही चटणी ७ दिवस चांगली टिकते, आणखी टिकायला हवी असेल तर फ्रिजमध्ये ठेवायची.

 

Web Title: Curry Leaves Chutney Easy and healthy Recipe : Does the Curry Leaves dry out? Make a bowl of curry leaves into a tasty-healthy mouth-watering chutney...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.