Lokmat Sakhi >Food > केस गळतात पुन्हा वाढतच नाही? रोज खा 'ही' चमचाभर चविष्ट चटणी; केस वाढतील भरभर - दिसतील सुदंर

केस गळतात पुन्हा वाढतच नाही? रोज खा 'ही' चमचाभर चविष्ट चटणी; केस वाढतील भरभर - दिसतील सुदंर

Curry Leaves Chutney For Hair Fall : फक्त चमचाभर 'ही' चटणी रोज खाल तर, केसांच्या अनेक समस्या सुटतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2024 06:05 PM2024-06-14T18:05:47+5:302024-06-14T18:06:53+5:30

Curry Leaves Chutney For Hair Fall : फक्त चमचाभर 'ही' चटणी रोज खाल तर, केसांच्या अनेक समस्या सुटतील..

Curry Leaves Chutney For Hair Fall | केस गळतात पुन्हा वाढतच नाही? रोज खा 'ही' चमचाभर चविष्ट चटणी; केस वाढतील भरभर - दिसतील सुदंर

केस गळतात पुन्हा वाढतच नाही? रोज खा 'ही' चमचाभर चविष्ट चटणी; केस वाढतील भरभर - दिसतील सुदंर

सतत केस गळत असल्याकारणाने बऱ्याचदा स्काल्प दिसू लागते (Hair Care Tips). टक्कल पडण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे केसांची रोज काळजी घेणं गरजेचं आहे. निरोगी, काळे, मजबूत केस असावे  असं प्रत्येकाला वाटते (Hair Fall). पण केसांची योग्य निगा न राखल्यामुळे केस भरपूर गळतात (Curry Leaves for Hairs). केसांना पोषण देण्यासाठी त्यांना नियमित तेल लावणं आवश्यक. तसेच आहार देखील आरोग्यदायी हवे. शिवाय पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करावा.

केस गळती कमी करण्यासाठी आपण आहारात कडीपत्ताच्या चटणीचा आहारात समावेश करू शकता. याची रेसिपी पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी शेअर केली आहे. त्यांच्या मते, 'कडीपत्त्यात अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. जे केसांना मुळापासून मजबूत करतात. ज्यामुळे केस गळणे कमी होते, व केसाची लवकर वाढ होते'(Curry Leaves Chutney For Hair Fall).

केसांसाठी कडीपत्त्याची चटणी म्हणजे वरदान

कडीपत्ता

अर्धी वाटी किसलेल खोबरं

शेंगदाणे

पांढरे तीळ

लसूण

साऊथ इंडियन पारंपरिक पद्धतीची बटाट्याची भाजी करा फक्त १५ मिनिटांत, चमचमीत इतकी की खातच राहावी!

आलं

हिरवी मिरची

मीठ

पाणी

अशा पद्धतीने बनवा कडीपत्त्याची चटणी

सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात कडीपत्ता घालून भाजून घ्या. नंतर त्यात शेंगदाणे, किसलेलं खोबरं, लसूण, पांढरे तीळ, आलं, हिरवी मिरची, मीठ घालून भाजून घ्या. भाजलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

जान्हवी कपूरला आवडतो तसा करा मुगाचा डोसा, वाटीभर हिरव्या मुगाचा झटपट पदार्थ-वजन वाढवत नाही

आता कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा मोहरीचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर २ ते ३ कडीपत्त्याची पानं घाला. आणि पेस्ट घालून चमच्याने मिक्स करा. अशा प्रकारे चविष्ट कडीपत्त्याची चटणी खाण्यासाठी रेडी. या चटणीचे सेवन आपण दररोज करू शकता. यामुळे केसांची योग्य वाढ होईल. शिवाय पातळ होणे, गळणे, पांढरे होणे यांसारख्या समस्या दूर होतील.

Web Title: Curry Leaves Chutney For Hair Fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.