कडीपत्ता (Curry Leaves) हा रोजच्या आहाराचा महत्वाचा भाग आहे (Curry Leaves Chutney). फोडणीमध्ये आपण कडीपत्ता घालतोच. कडीपत्त्यामुळे पदार्थाची चव वाढते. अनेक जण पदार्थातून कडीपत्ता वगळून खातात (Cooking tips). पण उत्तम आरोग्य हवं असेल तर, कडीपत्ता खाणं गरजेचं आहे. यामुळे शरीराला अनेक पोषक घटक मिळतात.
त्यात व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जर आपणही पदार्थातून कडीपत्ता वगळून खात असाल तर, कडीपत्त्याची चविष्ट चटणी करून खा. यातील पौष्टीक घटकांमुळे केस, त्वचा आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातील. कडीपत्त्याची चविष्ट चटणी नेमकी कशी करायची? पाहूयात(Curry Leaves Chutney | Kadi Patta Chutney).
खमंग कडीपत्त्याची चटणी कशी करायची?
लागणारं साहित्य
कडीपत्ता
पाणी
प्रत्येक पदार्थावर लिंबू पिळून खाता? फूड इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त; पोट बिघडेल - होईल त्रास
तेल
लाल सुक्या मिरच्या
उडीद डाळ
शेंगदाणे
सुकं खोबरं
भाजलेले चणा डाळ
मीठ
साखर
जिरं
लसूण
कृती
सर्वात आधी एका बाऊलमध्ये कडीपत्त्याची पानं काढून घ्या, त्यात पाणी घालून कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्या. गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. त्यात २ ते ३ लाल सुक्या मिरच्या भाजून घ्या. नंतर त्यात अर्धी वाटी उडीद डाळ, शेंगदाणे, एक वाटी सुकं खोबऱ्याचं किस आणि एक वाटी भाजलेले चणा डाळ घालून भाजून घ्या. भाजलेलं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि चिंच घाला.
पावसाळ्यात ४ पदार्थ न चुकता खा, सुधारेल पचन आणि मेटाबॉलिजम वाढल्याने वजनही घटेल पटकन
नंतर कढईमध्ये एक चमचा तेल घालून त्यात ३ चमचे जिरं आणि ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या घालून भाजून घ्या. नंतर त्यात कडीपत्त्याची पानं घालून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं साहित्य आणि कडीपत्ता घालून सर्व एकत्र वाटून घ्या. अशा प्रकारे कडीपत्त्याची खमंग चटणी खाण्यासाठी रेडी. आपणही चटणी खिचडी, भाकरी, चपातीसोबत खाऊ शकता.