जेवताना तोंडी लावण्यासाठी ताटात हमखास चटक - मटक पदार्थ लागतोच. चटणी, पापड, कुरडई, लोणची, हे पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात. चटण्यांमध्ये देखील दोन प्रकार असतात. एक ओली आणि दुसरी सुकी चटणी. महराष्ट्रात आपण खोबऱ्याची, लसणाची, तिळाची, शेंगदाण्याची चटणी खाऊन पाहिली असेलच. जर आपल्याला याच प्रकारच्या चटण्या खाऊन कंटाळा आला असेल तर, कडीपत्त्याची सुकी चटणी तयार करून पाहा.
कडीपत्ता आरोग्यासाठी चांगला मानला जातो. मात्र, काही लोकं कडीपत्ता पदार्थातून वगळून काढतात. जर आपल्या घरातील सदस्य देखील पदार्थातून कडीपत्ता वगळून काढत असतील तर, त्यांना खास कडीपत्त्याची चटणी तयार करून द्या. चवीला भारी, आरोग्यासाठी हेल्दी ही चटणी कशी तयार करायची पाहूयात(Curry Leaves Chutney (Kadi Patta Chutney) Indian Recipe).
कडीपत्त्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य
कडीपत्ता
तेल
हिंग
दही खाणं चांगलं की ताक पिणं उत्तम? दही कुणी खावं आणि ताक कुणी प्यावं या प्रश्नाचं उत्तरं..
जिरं
शेंगदाणे
लसूण
पांढरे तीळ
किसलेलं सुकं खोबरं
लाल तिखट
आमचूर पावडर
मीठ
कृती
सर्वप्रथम, पॅनमध्ये एक चमचा तेल घालून गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मुठभर कडीपत्ता घालून भाजून घ्या. कडीपत्ता क्रिस्पी झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्याच पॅनमध्ये पुन्हा एक चमचा तेल घाला. नंतर त्यात चिमुटभर हिंग, एक चमचा जिरं, मुठभर शेंगदाणे घालून भाजून घ्या. साहित्य भाजून झाल्यानंतर त्यात ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, दोन चमचे पांढरे तीळ, २ चमचे किसलेलं सुकं खोबरं घालून परतवून घ्या.
चटणी तयार करण्यासाठी मिक्सरचं भांडं घ्या, त्यात भाजलेलं सर्व साहित्य घाला. नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालून साहित्य बारीक करून घ्या. तयार चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे चमचमीत कडीपत्त्याची चटणी खाण्यासाठी रेडी.