Lokmat Sakhi >Food > कडीपत्त्याची करा खमंग चटणी, केसांच्या तक्रारी ते पोटाचे आजार-गुणकारी उपाय; खर्च फक्त ५ रुपये

कडीपत्त्याची करा खमंग चटणी, केसांच्या तक्रारी ते पोटाचे आजार-गुणकारी उपाय; खर्च फक्त ५ रुपये

Curry Leaves Kadipatta Chutney Recipe : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून अतिशय झटपट होणारी ही चटणी कशी करायची पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 01:09 PM2023-12-20T13:09:23+5:302023-12-20T13:22:35+5:30

Curry Leaves Kadipatta Chutney Recipe : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून अतिशय झटपट होणारी ही चटणी कशी करायची पाहूया...

Curry Leaves Kadipatta Chutney Recipe | कडीपत्त्याची करा खमंग चटणी, केसांच्या तक्रारी ते पोटाचे आजार-गुणकारी उपाय; खर्च फक्त ५ रुपये

कडीपत्त्याची करा खमंग चटणी, केसांच्या तक्रारी ते पोटाचे आजार-गुणकारी उपाय; खर्च फक्त ५ रुपये

कढीपत्ता भाजी किंवा आमटीत फोडणीत घातला तर आपण तो बाजूला काढून टाकतो. त्यामुळे पदार्थाला त्याचा स्वाद लागत असला तरी प्रत्यक्ष कडीपत्ता पोटात जातच नाही. मात्र ढीपत्ता आरोग्याच्या विविध तक्रारींवर अतिशय उपयुक्त असून सौंदर्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो. पदार्थाला स्वाद आणि चव आणण्याबरोबरच कढीपत्त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. पारंपरिक गोष्टींचा आहारात आणि सौंदर्यप्रसाधने म्हणून योग्य पद्धतीने वापर केल्यास आपल्या बऱ्याच तक्रारी दूर होण्यास मदत होते. कडीपत्त्यामध्ये असणारे गुणधर्म केस, त्वचा, पोटाच्या तक्रारी यांसारख्या अनेक समस्यांवर उपयुक्त ठरतात (Curry Leaves Kadipatta Chutney Recipe).

कडीपत्त्याचा हेअर पॅक, कडीपत्त्याचे तेल यांसारख्या गोष्टींचा वापर केल्यास केस गळणे कमी होण्यास मदत होते. तसेच केस पांढरे झाले असतील तरी कडीपत्त्याच्या पानांचा चांगला फायदा होतो. केसांतील उवा-लिखा घालवण्यासाठीही कडीपत्त्याची पेस्ट ताकात मिसळून लावल्यास ही समस्या दूर होते.त्याचप्रमाणे चटणीच्या रुपाने कडीपत्ता आहारात घेतला तर जेवणाची रंगतही वाढते आणि आरोग्याला फायदे होतात. घरात सहद उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून अतिशय झटपट होणारी ही चटणी कशी करायची पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य - 

१. कडीपत्ता - २ वाट्या 

२. डाळं - पाव वाटी 

३. उडीद डाळ - २ चमचे 

४. किसलेले सुके खोबरे - २ चमचे 

५. शेंगदाणे - पाव वाटी 

६. लसूण - ७ ते ८ पाकळ्या

७. जिरे - १ चमचा 

८. चिंच - १ तुकडा

९. तिखट - २ चमचे

१०. मीठ - चवीनुसार 

११. तेल - २ चमचे 

कृती - 

१. कडीपत्ता स्वच्छ धुवून वाळत ठेवायचा.

२. दुसरीकडे कढईत तेल घालून उडदाची डाळ गुलाबी रंगाची होईपर्यंत भाजून घ्यायची.

३. त्याच तेलात शेंगदाणे आणि नंतर डाळं खरपूस भाजून घ्यायचे. 

४. त्यानंतर याच तेलात जीरं आणि लसूण भाजून घ्यायचे आणि सगळे एका ताटात काढून ठेवायचे. 

५. कडीपत्ताही पूर्ण कोरडा होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आणि गार करायला ठेवायचा.

६. सगळं साहित्य एकत्र करुन त्यामध्ये मीठ, तिखट आणि चिंच घालायची. 

७. हे मिश्रण मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचे आणि एका बरणीत काढून ठेवायचे.

८. ही चटणी २ ते ३ महिने टिकते आणि भात वरण, पोळी कशासोबतही अतिशय छान लागते. 

Web Title: Curry Leaves Kadipatta Chutney Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.