Lokmat Sakhi >Food > फक्त १ कप सीताफळाचा गर वापरून १० मिनिटांत करा सीताफळ फ्रुट क्रिम, मुलांसाठी खास पदार्थ...

फक्त १ कप सीताफळाचा गर वापरून १० मिनिटांत करा सीताफळ फ्रुट क्रिम, मुलांसाठी खास पदार्थ...

Custard Apple Cream : Seethaphal Cream : How To Make Custard Apple Cream Recipe : सीताफळ फ्रुट क्रिम नेमके कसे करायचे त्याची सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2024 01:09 PM2024-09-17T13:09:23+5:302024-09-17T13:14:36+5:30

Custard Apple Cream : Seethaphal Cream : How To Make Custard Apple Cream Recipe : सीताफळ फ्रुट क्रिम नेमके कसे करायचे त्याची सोपी रेसिपी

Custard Apple Cream Seethaphal Cream How To Make Custard Apple Cream Recipe | फक्त १ कप सीताफळाचा गर वापरून १० मिनिटांत करा सीताफळ फ्रुट क्रिम, मुलांसाठी खास पदार्थ...

फक्त १ कप सीताफळाचा गर वापरून १० मिनिटांत करा सीताफळ फ्रुट क्रिम, मुलांसाठी खास पदार्थ...

सध्या आपल्याला बाजारांत हिरवीगार सीताफळ सगळ्या ठेल्यांवर पहायला मिळतात. सीताफळ हे बऱ्याचजणांच्या आवडीचे फळ आहे. अतिशय गोड लागणारे हे फळ चवीलाही खूपच छान लागते. सीताफळामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. सीताफळ हे एक असं फळ आहे की जे वर्षातून फक्त काही मोजकेच महिने मिळत. सीताफळ वर्षभर न मिळता काही मोजकेच दिवस मिळत असल्याने ते फळ आपण आवडीने खातोच, शिवाय या फळाच्या पल्प पासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून अतिशय आवडीने फस्त केले जातात. या फळाचा आस्वाद वर्षभर घेता येत नाही म्हणूनआपण वेगवेगळे पदार्थ किंवा या फळाचा वापर करुन तयार केलेले पदार्थ आवडीने खातो. अशावेळी सीताफळ आईस्क्रीम, सीताफळ रबडी, सीताफळ बासुंदी असे अनेक पदार्थ तयार करून हे फळ खाण्याचा आनंद घेतला जातो(Custard Apple Cream).

सीताफळापासून तयार केलेल्या अनेक पदार्थांपैकी सीताफळाच्या पल्पचे फ्रुट क्रिम हा एक नवीन आणि खास प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. जर आपल्याकडे सीताफळ आणली असतील, ती जर खाणे शक्य होत नसले किंवा काहीवेळा सीताफळ जास्ती पिकून मऊ पडते अशावेळी आपण ही झटपट रेसिपी करू शकतो. सीताफळाचा पल्प वापरून त्यापासून सीताफळ फ्रुट क्रिम (Seethaphal Cream) नेमके कसे तयार करायचे त्याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Custard Apple Cream Recipe).

साहित्य :- 

१. सीताफळांचा पल्प - ३ कप 
२. फ्रेश क्रिम - २ कप 
३. व्हॅनिला इसेंन्स - २ ते ३ थेंब 
४. बर्फाचे खडे - ६ ते ८ खडे 
५. कंडेंन्स मिल्क - ६० ग्रॅम 
६. पाणी - २ ते ३ टेबलस्पून 

इडलीच्या पिठाचे करा खमंग - खुसखुशीत बटाटेवडे फक्त १० मिनिटांत!  पाहा साधीसोपी भन्नाट रेसिपी... 


चहात आलं घालताना ते किसून घालावं की कुटून ? "ही ' पद्धत उत्तम, चहा होईल फक्कड...

कृती :- 

१. सीताफळ घेऊन ती एका मोठ्या गाळणीत घालून त्यात किंचितसे पाणी घालून चमच्याच्या मदतीने दाबून व्यवस्थित त्याचा पल्प काढून घ्यावा. 
२. आता एक मोठा बाऊल घेऊन त्यात बर्फाचे खडे घालून घ्यावेत. त्यानंतर एका दुसऱ्या बाऊलमध्ये क्रिम काढून घ्यावी. क्रिम काढून घेतलेला बाऊल त्या बर्फाच्या खडे असणाऱ्या बाऊलमध्ये ठेवावा. 

मसाला चहा तर नेहमीचाच ! कधी पहाडी मसाला चहा प्यायलाका ? एकदा पिऊन बघा  'असा' फक्कड चहा... 

३. त्यानंतर या क्रिमच्या बाऊलमध्ये व्हॅनिला इसेंन्सचे २ ते ३ थेंब घालावेत. त्यानंतर ब्लेंडरच्या मदतीने हे मिश्रण मिक्स करुन घ्यावेत. जोपर्यंत या मिश्रणाला थोडासा घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत हे मिश्रण ब्लेंडरच्या मदतीने घुसळून घ्यावे. 
४. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात कंडेंन्स मिल्क आणि सीताफळांचा पल्प घालून सगळे जिन्नस मिक्स करून घ्यावेत. 
५. सीताफळाच्या पल्पचे फ्रुट क्रिम तयार आहे आता हे फ्रुट क्रिम फ्रिजमध्ये २ ते ३ तास ठेवून व्यवस्थित सेट होऊ द्यावेत. 

   सीताफळाच्या पल्पचे फ्रुट क्रिम खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Custard Apple Cream Seethaphal Cream How To Make Custard Apple Cream Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.