ऊन्हाळ्याच्या दिवसांत नेहमी त्याच त्यात भाज्या खाण्याचा कंटाळा येतो. (Kadhi Recipe) दुपारच्या जेवणासाठी दह्याची कढी हा उत्तम पर्याय आहे. ही कढी करण्याासाठी तुम्हाला फार वेळ लागणार नाही. कढी फुटते किंवा जास्त आंबट होते अशा समस्या घरी कढी बनवताना येतात. (How To Make Kadhi At Home) हे टाळण्यासाठी घरच्याघरी कढी करण्याची परफेक्ट रेसिपी माहीत करून घ्या. कढी बनवण्याससाठी तुम्हाला बाजारातून फार काही विकत आणण्याची गरज नाही. स्वंयपाकघरात उपलब्ध असलेल्या साहित्यपासून तुम्ही ताकाची कढी बनवू शकता. (Kadhi Making Tips)
दह्याची कढी करण्यासाठी लागणारं साहित्य (Dahi Kadhi Making Process Step by Step)
१) दही- १ वाटी
२) बेसनाचे पीठ- २ ते ३ चमचे
३) हळज- पाव टिस्पून
४) पाणी- गरजेनुसार
५) तेल- फोडणीसाठी
६) जीरं- १ टिस्पून
७) मोहरी - १ टिस्पून
८) कढीपत्ता- ५ ते ६
९) आलं-लसूण पेस्ट- १ चमचा
१०) मिरचीची पेस्ट- १ चमचा
११) लाल मिरच्या -४
१२) साखर आणि मीठ- चवीनुसार
१३) कोथिंबीर- चवीनुसार
कढी करण्याची सोपी रेसिपी (Kadhi Kashi banvtat Dakhva)
१) सगळ्यात आधी एका पातेल्यात दही काढून घ्या. दही थंड असू नये. कढी करण्यासाठीर रूम टेम्परेचरवर असलेल्या ताकाचा वापर करा. त्यात बेसन पीठ, हळद घालून मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण रवीच्या साहाय्याने व्यवस्थित घुसळून घ्या किंवा मिक्सरच्या भांड्यातूनही फिरवून शकता.
डाळ शिजवताना थंड पाणी घालता की गरम? १ सोपी ट्रिक, रोजच्या वरणाची चव वाढेल
२) एका कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, कढीपत्ता घालून फोडणी तयार करून घ्या. यात आलं, लसणाची पेस्ट आणि लसणाची पेस्ट घालून चमच्याने मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात ताकाचे मिश्रण घालून चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्या. चवीनुसार मीठ, हळद घाला. सुरूवातीला ३० सेकंद उच्च आचेवर ठेवल्यानंतर मंच आचेवर ठेवून कढी शिजवा. कढी शिजत असताना चमच्याने ढवळत राहा. न ढवळल्यामुळे कढी फुटण्याची शक्यता असते.
३) ८ ते १० मिनिटांत कढी व्यवस्थित बनून तयार होईल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कढी सर्व्ह करा. एका फोडणी पात्रात मोहोरी, जीरं, लाल मिरचीची फोडणी तयार करून कढीवर घाला. भात, चपाती किंवा भाकरीबरोबर तुम्ही कढी खाऊ शकता. ऊन्हाळ्यात शरीराला गारवा मिळण्यासाठी दही, ताक आणि त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा.