Join us  

साध्या जेवणालाही चटकदार चव आणणारी आणि वर्षभर टिकणारी दही मिरची, रेसिपी बघा- लगेच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2024 3:53 PM

How To Make Dahi Mirchi: चटपटीत चवीची दही मिरची एकदा करून पाहा. तुमचं रोजचं, साधं जेवणही अगदी रंगतदार होईल...(dahi mirchi recipe in Marathi)

ठळक मुद्देदही मिरची वारंवार करत बसण्याची गरज नाही. एकदाच करून ठेवली तर अगदी वर्षभर चांगली टिकेल.

वरण, भात, भाजी, पोळी असा सगळा स्वयंपाक असला तरी ताटामध्ये चटणी, कोशिंबीर, ठेचा, लोणचे असे काही पदार्थ तोंडी लावायला पाहिजेच असतात. कारण या पदार्थांशिवाय जेवणाची मजा खुलत नाही. म्हणूनच आता तोंडी लावण्यासाठी दही मिरची कशी करायची ती रेसिपी एकदा पाहून घ्या. या मिरच्यांची पाकिटं बाजारात अनेक दुकानांमध्ये मिळतात. पण ती एवढी महाग पाकिटं घेण्यापेक्षा या अगदी सोप्या पद्धतीने घरच्याघरी एकदा दही मिरची करून पाहा (dahi mirchi recipe in marathi). विकत मिळणाऱ्या त्या मिरचीपेक्षा तुम्ही घरी केलेली दही मिरची नक्कीच अधिक चवदार, खमंग लागेल (how to make dahi mirchi). शिवाय ती वारंवार करत बसण्याची गरज नाही. एकदाच करून ठेवली तर अगदी वर्षभर चांगली टिकेल. (mirchi with curd recipe)

दही मिरची करण्याची रेसिपी

 

साहित्य

१५ ते २० हिरव्या मिरच्या (पोपटी रंगाच्या ज्या हिरव्या मिरच्या बाजारात मिळतात, त्या या रेसिपीसाठी घ्याव्या. कारण त्या खूप तिखट नसतात. गर्द हिरव्या रंगाच्या तिखट मिरच्या घेणं टाळा.)

१ ते दिड वाटी आंबट दही

ॲवॉर्ड सोहळ्यानंतर थेट दवाखान्यात जाऊन पहिला केमो घेतला, हिना खान सांगते मी पक्क ठरवलं आहे की.....

१ टेबलस्पून धने- जिरे पूड 

अर्धा टिस्पून हिंग

१ टीस्पून हळद

१ टेबलस्पून दाण्याचा कुट

चवीनुसार मीठ

 

कृती 

सगळ्यात आधी मिरच्या स्वच्छ धुूवून व्यवस्थित कोरड्या करून घ्या. यानंतर मिरच्यांवर उभा काप द्या.

यानंतर एका भांड्यात दही घ्या. त्यामध्ये मीठ, हिंग, हळद, धने- जिरे पूड, दाण्याचा कूट असं सगळं टाका आणि दही चांगलं फेटून घ्या. 

काळपट, कोरडे ओठ होतील गुलाबी आणि लोण्यासारखे मऊ, बघा १ खास उपाय- लिपस्टिकची गरजच नाही

त्यानंतर दह्यामध्ये मिरच्या टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या. दही सगळ्या मिरच्यांना सारखं लागेल असं पाहा. यानंतर या भांड्यावर झाकण ठेवा आणि रात्रभर मिरच्या दह्यामध्ये मुरू द्या.

यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी एका ताटात प्लॅस्टिक पसरवा आणि त्यावर या मिरच्या उन्हात वाळत घालायला ठेवा. मिरच्या पुर्णपणे वाळल्या की त्या डब्यात भरून ठेवू शकता.

जेव्हा खायच्या असतील तेव्हा जेवढ्या पाहिजे तेवढ्या मिरच्या घ्या आणि त्या तेलात तळून काढा. जेवणात तोंडी लावायला खूप छान लागतात. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.