Join us  

२ कांदे चिरा आणि बनवा झटपट दही प्याज, अफलातून रेसिपी करायला सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 11:57 AM

Dahi Pyaz Ki Sabji Recipe, Check out unique recipe : कांद्याची भजी खाली असेल आता दही कांद्याची भाजी खाऊन पाहा, चटकदार भाजी, खाल २ घास जास्त..

भारतीय थाळीमध्ये भाजी-चपाती हमखास असतेच. पोळी किंवा भाकरीसह विविध प्रकारच्या भाज्या केल्या जातात. सध्या हिवाळा सुरु आहे. हिवाळ्यात पालेभाज्या प्रचंड प्रमाणात मिळते. शिवाय ताटात भेंडी, फरसबी, कोबीची भाजी असतेच. पण घरात भाजी नसेल किंवा भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर, दही प्याज ही रेसिपी करून पाहा. प्रत्येक जण घरात कांदा साठवून ठेवतो.

जर घरात भाजी नसेल किंवा, चपातीसह हटके काहीतरी करायचं असेल तर, एकदा ही रेसिपी करून पाहाच (Dahi Pyaz). दही कांदा ही रेसिपी करायला सोपी, शिवाय चवीला चटकदार लागते (Cooking Tips). चला तर मग अफलातून हटके अशी दही प्याज ही रेसिपी कशी तयार करायची पाहूयात(Dahi Pyaz Ki Sabji Recipe, Check out unique recipe).

दही प्याज करण्यासाठी लागणारं साहित्य

तेल

जिरं

मोहरी

बडीशेप

गुलाबी थंडीत लाल रसाळ टोमॅटोचे करा चटकदार सूप, इन्स्टंट सूपपेक्षा घरगुती सूप आरोग्यासाठी बेस्ट

मेथी दाणे

आलं-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट

धणे पूड

जिरं पूड

गरम मसाला

लाल तिखट

दही

कांदा

कृती

सर्वप्रथम, कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं, मोहरी, मेथी दाणे, बडीशेप,कलौंजी आणि आलं-लसूण-मिरचीचा ठेचा घालून परतवून घ्या. नंतर त्यात टोमॅटो प्युरी, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, एक चमचा लाल तिखट, अर्धा टेबलस्पून धणे पूड, अर्धा टेबलस्पून जिरं पावडर आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला घालून मिक्स करा. २ मिनिटानंतर त्यात कपभर फेटलेलं एक कप दही घालून मिक्स करा.

ना गॅस, ना तूप-तेल, करा झटपट तिळाचे लाडू! फक्त ३ गोष्टी, आणि हाडं मजबूत

गॅस मध्यम आचेवर ठेवा, व त्यात २ ते ३ लांबट आकारामध्ये चिरलेला कांदा घालून मिक्स करा. त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा. शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे दही प्याज खाण्यासाठी रेडी. आपण या भाजीचा आस्वाद पोळी, पराठा किंवा भातासह लुटू शकता. तोंडी लावण्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स