नाश्त्याला काहीतरी हलकं फुलकं खायचं म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे ढोकळा. (Dhokla Making Tips) ढोकळा करताना घश्यात अकडतो तर कधी व्यवस्थित फुलत नाही अशी महिलांची तक्रार असते. बाहेरून आणलेल्या विकतच्या डोकळ्यात जास्त प्रमाणात सोडा असू शकतो. (Dal Chawal Dhokla Step by Steps Process) यापेक्षा घरच्याघरी सोप्या पद्धतीने डाळ-तांदूळाचा ढोकळा कसा करायचा ते पाहूया. (How to Make Dhokla At Home) मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. (Dhokla Recipe)
डाळ-तांदूळाचा ढोकळा करण्याची सोपी रेसिपी (Dal Rice Dhokla Recipe)
१) सगळ्यात आधी १ वाटी जाड तांदूळ आणि अर्धा कप चण्याची डाळ ३ ते ४ वेळा व्यवस्थित धुवून घ्या. यात पाणी घालून जवळपास ८ ते १० तासांसाठी भिजवायला ठेवा. तुम्ही जितका जास्तवेळ भिजवून ठेवाल तितकीच जास्त चांगली चव येईल.
२) डाळ तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात डाळ-तांदूळ, अर्धा कप दही, आणि थोडं पाणी घालून मिश्रण तयार करून घ्या. वाटताना त्यात २ चमचे पाणी घाला, यात जास्त पाणी घालू नका. ढोकळा करण्यासाठी डाळ-तांदूळाची मध्यम पातळ पेस्ट तयार करा. ही पेस्ट २ मिनिटांसाठी व्यवस्थित ढवळून घ्या. तयार बॅटरमध्ये हलकी जाळी तयार होईल. हा ढोकळा बनवण्यासाठी थोडा वेळ लागेल पण बेसनाच्या ढोकळ्याप्रमाणेच हा ढोकळा चवदार आणि चविष्ट लागतो.
३) एका मिक्सरच्या भांड्यात आलं आणि मिरचीची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट ढोकळ्याच्या बॅटरमध्ये घाला. त्यात थोडं मीठ आणि १ चिमुट हिंग, १ चमचा साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. साखरेमुळे ढोकळ्याला फार गोडवा येत नाही पण चवीचे संतुलन राहते. त्यात तुम्ही पिवळा फुड कलर किंवा हळद घालू शकता.
दूध प्यायची सवयच नाही-कॅल्शियम कसं मिळणार? रोज ५ पदार्थ खा, हाडांन दुप्पट कॅल्शियम मिळेल
४) ढोकळ्यासाठी एका थाळीला तेल लावून घ्या. पेस्टमध्ये १ टिस्पून इनो घाला. तुम्हाला इनो घालायचं नसेल तर यात तुम्ही बेकींग सोडा घालू शकता. एका पसरट कढईत पाणी गरम करून घ्या. त्यावर स्टॅण्ड ठेवून ढोकळ्याचे पीठ घाललेलं ताट ठेवा. वर झाकण ठेवा किंवा कापडाने बांधून घ्या. १० ते १५ मिनिटांनी ढोकळा तयार झालेला असेल. सुरी किंवा टुथपिकने ढोकळा शिजला आहे की नाही ते तपासून गॅस बंद करा.
५) कढईत तेल गरम करून त्यात राई, जीरं, मिरचीची फोडणी तयार करा. यात तुम्ही आवडीनुसार साखर आणी पाणीसुद्धा घालू शकता. तयार फोडणी ढोकळ्यांवर घाला. तयार आहे गरमागरम ढोकळा.