रोज घरातलं खाऊन सगळ्यांनाच बाहेरचं खाण्याची इच्छा होते. सध्या वेगानं परसणारे साथीचे आजार आणि सुरक्षितता लक्षात घेता बाहेरचं खाण्याआधी लोक १० वेळा विचार करतात. घरच्याघरीसुद्धा तुम्ही नवनवीन हॉटेलस्टाईल रेसेपीज बनवू शकता. हॉटेलस्टाईल दाल खिचडीचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. (How to make dal khchadi) दाळ, तांदूळ, हिंगाची फोडणी आपल्या रोजच्या वापरातलेच पदार्थ असतात पण दाळ खिचडीची चव मात्र अफलातून असते. (Cooking Tips)
खिचडी किंवा डाळ भातापेक्षा काही वेगळे खायची इच्छा झाली असेल तर तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून पाहा. यात तुम्ही आपल्या आवडीनुसार मसूर, मूग किंवा तूर डाळीचा वापर करू शकता. काहीजण यात दालखिचडी टॉमॅटो जास्त घातात तर काहीजण आपल्या आवडीनुसार लसणाचा वापर जास्त करतात. (How to make hotel style dal khichdi at home)
साहित्य
तांदूळ (शक्यतो जुना घ्या)
तुरीची डाळ पाव वाटी
तूप किंवा तेल (आवडीनुसार)
हळद
मोहरी
जिरे
हिंग
लसूण पाकळ्या आठ ते दहा
कढीपत्ता
कोथिंबीर
मीठ
दोन लाल मिरच्या
पाणी
कृती :
तांदूळ आणि डाळ दोनवेळा पाण्यात धुवून १० मिनिट वेगवेगळे भिजवा. गॅसवर तीन वाट्या पाणी उकळून घ्या.
आता चमचाभर तेल किंवा तुपात तांदूळ आणि डाळ परतून घ्या. आत त्यात चिमूटभर हळद आणि दोन लहान चमचे मीठ घाला.
ही खिचडी तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या. ही खिचडी पळीने घोटून एकजीव करून घ्या. पळीमध्ये आवडीनुसार तेल किंवा तूप घालून गरम करा. त्यात मोहरी तड्तडवून घेऊन जिरे घाला. आता त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता आणि कोथिंबीर चिरून घाला.
आता या फोडणीत पाव चमचा हिंग घाला आणि जळण्याच्या आधी ही फोडणी खिचडीवर घाला. आता उरलेली कोथिंबीर घालून सजवून सर्व्ह करा 'पौष्टिक दाल-खिचडी'. दाल खिचडीसोबत उडदाचा भाजलेली पापड खूप मस्त लागतो.
1)
2)
3)