जेवायला बसल्यानंतर रोज ताटात त्याच त्याच भाज्या असतील तर जेवायची इच्छाच निघून जाते. कारण जेवणात वेगवगळे पदार्थ असतील जेवायचा आनंदही दुप्पटीनं घेता येतो. प्रत्येक घरांमध्ये दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला भात बनवला जातो. नेहमी नेहमी वरण भात करण्याऐवजी तुम्ही पुलाव, बिर्याणी किंवा मसालेभात बनवला तर घरातील सगळेजण पोटभर जेवतात. (Dal Khichdi Recipe) हे पदार्थ बनवण्याासाठी बराचवेळ लागतो. रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही अगदी कमीत कमी वेळात डाळ खिचडी बनवू शकता. (Dal khichdi Recipe) डाळ खिचडीत ३ ते ४ प्रकारच्या डाळींचा समावेश असतो. त्यामुळे चवीला आणि तब्येतीसाठीही डाळ खिचडी उत्तम ठरते. डाळ खिचडीची साधी, सोपी रेसिपी पाहूया. (How to make dal khichdi)
साहित्य
तांदूळ - १ कप
मसूर डाळ - पाव कप
मूग डाळ - पाव कप
तूर डाळ - पाव कप
उडीद डाळ - पाव कप
तूप - ३ ते ४ चमचे
चिरलेला टोमॅटो - १
चिरलेला कांदा - १
चिरलेली कोथिंबीर - पाव वाटी
फोडणीसाठी
मोहोरी - १ टिस्पून
जीरं - १ टिस्पून
चिरलेल्या मिरच्या - २
आल्याची पेस्ट - अर्धा टिस्पून
चिरलेले लसूण - ५ ते ६
कढीपत्ता पानं - ८ ते १०
कृती
सगळ्यात आधी पांढरी उडिदाची डाळ, मूगाची डाळ, मसूर डाळ, तुरीची डाळ, तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुवा. नंतर अर्धा तासाठी पाण्यात भिजवून ठेवा. नंतर एका खोलगट कढईत किंवा मातीच्या भाड्यात २ चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर तर त्यात, मोहोरी, जीरं, कढीपत्ता, हिंग, मिरच्या, आलं, लसूण घालून परतून घ्या.
त्यात चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो घालून मिश्रण शिजवून घ्या. यात बटाट्याचे काप, हिंग, मीठ, हळद, चिली पावडर, धणे पावडर घालून परतवून घ्या,यात वटाणे घाला. पावसाळ्यात तुम्ही ताजे मक्याचे दाणेही यात घालू शकता. हे शिजल्यानंतर त्यात डाळ-तांदूळ घाला नंतर पाणी घालून झाकण ठेवा. त्यावरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा. तयार आहे गरमागरम डाळ खिचडी. डाळ खिचडी तुम्ही लोणचं, पापड किंवा सुक्या चटणीसह खाऊ शकता.