Join us  

ढाबास्टाइल दाल पालक करा घरच्याघरी फक्त १० मिनिटात; खाणारे म्हणतील क्या बात है..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 1:32 PM

Dal Palak Recipe : पालकाची भाजी खायला मुलंही नाक मुरडतात पण जर दाल पालक बनवलीत तर मुलं आवडीनं खातील. (How to make dal palak)

 डाळ भाताशिवाय अनेकांचं जेवण अपूर्ण असतं. खूपजण असे आहेत ज्यांना भाताशिवाय जेवणच जात नाही. पण रोज सारख्याच चवीचा भात खायलाही खूप कंटाळवाणं वाटतं जर जेवणात विविधता असेल तर २ घास जास्त जातात. थंडीच्या दिवसात पालेभाज्या भरपूर मिळतात. (Make Dhaba style Dal Palak at home in just 10 minutes) पालकचा वापर करून तुम्ही जेवणासाठी दाल पालक बनवू शकता.  पालकाची भाजी खायला मुलंही नाक मुरडतात पण जर दाल पालक बनवलीत तर मुलं आवडीनं खातील. (How to make dal palak)

मुगाच्या डाळीच्या सेवनाचे फायदे (Dhaba Style Dal Palak Recipe)

१) मुगाच्या डाळीत लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि प्रथिने यांसारखे घटक आढळतात, जे शरीरातील कमकुवतपणा दूर करण्यास आणि ऊर्जा वाढवण्यास मदत करतात.

2) रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाची समस्या उद्भवते. ही समस्या टाळण्यासाठी मूग डाळीचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

3) मूग डाळ रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर मानली जाते. मूग डाळीमध्ये आढळणारे पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

4) मसूरमध्ये फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. फायबर आतड्यांमधून कचरा बाहेर टाकण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न